
एखादा आजार झाला की डॉक्टर आपल्याला औषध देतो. हेच औषध आणि गोळ्या घेऊन आपण काही दिवसांनी बरे होतो. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या गोळ्या आपण डोळे झाकून घेतो.

पण अनेकदा गोळ्या ज्या पॉकेटमध्ये येतात, त्यावर बरीच महत्त्वाची माहिती दिलेली असती. ही माहिती न वाचताच आपण त्या गोळ्या घाऊन टाकतो. अनेकदा तर आपण डॉक्टरांकडे न जाता थेट औषधालयात जाऊन अमुक-अमुक आजारासाठी एखादी गोळी घेऊन येतो.

घरी आणलेल्या गोळ्या कोणताही विचार न करता आपण घेऊन टाकतो. अनेकदा काही गोळ्यांच्या पॅकेट्सवर तुम्हाला एक लाल रंगाची रेष दिसली असली. या लाल रेषेचे फार वेगळे असे महत्त्व आहे.

ज्या गोळीच्या पॅकेटच्या मागे लाल रंगाची रेष असते, ती गोळी डॉक्टरांनी लिहून दिल्याशिवाय घ्यायची नसते. म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ही गोळी खा, असा या लाल रेषेचा अर्थ असतो. मात्र आपण या लाल रेषेकडे दुर्लक्ष करून ती खाऊन घेतो.

ही लाल रेष म्हणजे सामान्य जनता आणि औषधांची विक्री करणाऱ्यांसाठी सतर्कतेचा एक संदेश असतो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही गोळी घेतल्यास तुमच्या शरीरावर वाईट परिणाम पडू शकतात, असे यातून सांगायचे असते.