
आपले शरीर अनेक अवयवांनी बनलेले आहे. प्रत्येक अवयवाचे कार्य वेगळे असते. काही अवयव शरीराबाहेर दिसतात, जसे की हात, पाय, डोळे, नाक, कान, तोंड...

काही अवयव आपल्या शरीरात असले तरी ते अदृश्य असतात, जसे की हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड, यकृत, पोट इ.आपल्याला सहसा आपल्या शरीराच्या बहुतेक भागांची नावे माहित असतात. परंतु आपल्या शरीरात असे काही अवयव असतात ज्यांची नावे सहसा अज्ञात असतात.

उदाहरणार्थ, आपल्या नाक आणि वरच्या ओठांमधील दोन रेषांमध्ये एक डिंपल असते. चेहऱ्याच्या त्या भागाला आपण काय म्हणतो हे क्वचितच कोणाला माहिती असेल.

खरं तर, वरच्या ओठ आणि नाकामधील दोन रेषांना फिल्ट्रम म्हणतात. हिंदीमध्ये या भागाला "मध्य दरार" असं म्हणतात.

मराठीत त्या भागाला 'ओष्ठ अटनी' (Oshtha Atani) असं म्हणतात. सांगायचं झालं तर, फिलट्रम' (Philtrum) हे नाव प्राचीन ग्रीक शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ 'प्रेम-जादू' असा होतो.