
फोर्ब्सनुसार, अंबानी कुटुंबाची एकूण संपत्ती 113.5 अब्ज डॉलर आहे. रिलायन्स समूहातील विविध कंपन्यात मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी, मुलगा आकाश, अनंत आणि मुलगी ईशा अंबानी यांचा समावेश आहे.

या कुटुंबातील सदस्यांचा रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 50.33 टक्के शेअर आहे. या कुटुंबाचा कमाईचा मोठा स्त्रोत रिलायन्स कंपनी आहे. हे कुटुंब आशियातील श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे.

फोर्ब्स कंपनीच्या अहवालानुसार, या कुटुंबाची नेटवर्थ 113.5 अब्ज डॉलर इतकी आहे. अंबानी कुटुंबाने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने लाशांश रुपात 3,322.7 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

मुकेश अंबानी हे गेल्या चार वर्षांपासून वेतन घेत नाहीत. त्यांना आर्थिक वर्ष 2023-24 साटी 2 लाख रुपये सिटिंग फी आणि 97 लाख रुपये कमीशन देण्यात आले होते.

मुकेश आणि नीत अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी हा रिलायन्स जिओ इंफोकॉमचा चेअरमन आहे. तर मुलगी ईशा अंबानी ही रिलायन्स रिटेलचा कारभार सांभाळते.

अंबानी कुटुंबातील धाकटा मुलगा अनंत अंबानी हा जिओ प्लेटफॉर्म, रिलायन्स रिटेल, रिलायन्स न्यू एनर्जी आणि रिलायन्स न्यू सोलर एनर्जी या कंपन्यांचा कारभार पाहतो.