हे एक फळ खाल्ल्यास होतो चमत्कार, केसांपासून ते त्वचेपर्यंत सगळं काही बदलूनच जातं!
आयुर्वेदात अनेक शक्तिशाली आणि शरीरासाठी फायदेशीर असणारी फळं आहेत. या फळांचे सेवन केल्यावर शरीर निरोगी राहते. आयुर्वेदात आवळा या फळाला खूप महत्त्व आहे.

आयुर्वेदात अनेक शक्तिशाली आणि शरीरासाठी फायदेशीर असणारी फळं आहेत. या फळांचे सेवन केल्यावर शरीर निरोगी राहते. आयुर्वेदात आवळा या फळाला खूप महत्त्व आहे. या फळामध्ये सी जीवनसत्त्व असते.

आवळा या फळात व्हिटॅमिन असू शकते. आवळ्यात अँटीऑक्सिडंट असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. आवळ्यामुळे सर्दी, खोकला, इन्फेक्शन होत नाही. त्यामुळेच आयुर्वेदात आवळ्याला खूप महत्त्व आहे.

आवळ्याचे सेवन केल्याने जेवणाचे पचन पचन होते. पचनसंस्था सुधारते. आवळ्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बद्धकोष्ठता होत नाही. आवळा खाल्ल्याने अॅसिडिटी होत नाही.

केस आणि त्वचेसाठीदेखील आवळा खूप लाभदायक आहे. आवळा खाल्ल्याने त्वचा तजेलदार राहते. केसांची मुळं आणखी मजबूत होतात. केसगळती कमी होते. तसेच केसांची चमक वाढते. त्यामुळे ज्या मुलींना केसगळतीची समस्या आहे, त्यांनी आवळा खावा.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)