तुमच्या देखील घरातील मीठ ओलसर झाले आहे? तर या सोप्या टिप्सने पुन्हा कोरडे करा
जर तुमच्या देखील घरातील मीठ जर ओलसर झाले असेल तर या सोप्या पद्धतीने ओलसर मीठ पहिल्यासारखे कोरडे करता येईल. जाणून घ्या टीप्स.

स्वयंपाकघरात मीठ हा रोजच्या वापरातील अत्यावश्यक पदार्थ आहे. मात्र पावसाळा किंवा हवेत जास्त आर्द्रता असताना मीठ ओलसर होऊन त्याच्या गुठळ्या तयार होतात. त्यामुळे मीठ वापरण्यास त्रास होतो.
अशावेळी ते फेकून देण्याची गरज नाही. काही सोप्या उपायांच्या मदतीने ओलसर झालेले मीठ पुन्हा कोरडे करता येते. कसे ते जाणून घ्या सविस्तर
ओलसर झालेले मीठ सर्वप्रथम एका स्वच्छ प्लेटमध्ये पसरून घ्या. त्यानंतर ही प्लेट काही वेळ थेट उन्हात ठेवा. मीठ पूर्णपणे कोरडे होईपर्यंत ते उन्हात ठेवणे महत्त्वाचे आहे. यामुळे मिठातील अतिरिक्त ओलावा कमी होण्यास मदत होते.
जर मीठ खूपच ओलसर झाले असेल, तर ते हलक्या आचेवर थोडे गरम करूनही कोरडे करता येते. मात्र यावेळी विशेष काळजी घ्यावी. मीठ गरम करताना ते सतत हलवत राहावे, जेणेकरून ते तव्याला चिकटणार नाही किंवा एका ठिकाणी जास्त गरम होणार नाही.
मीठ साठवताना डब्यात ओलावा जाणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. मीठ काढण्यासाठी नेहमी कोरडा चमचा वापरावा. ओला चमचा वापरल्यास डब्यात पुन्हा ओलावा जाऊन मीठ ओलसर होऊ शकते.