ट्रम्प यांचा खास प्लॅन, रशियासाठी टाकलं जाळं, अलास्का बैठकीत पुतिन चक्रव्यूह भेदणार का?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशिसाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांत्यात अलास्का येथे बैठक होत आहे. या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पुतिन यांनी बैठकीला यावं तसेच चर्चेसाठी तयारी दाखवावी यासाठी ट्रम्प यांनी आखलेल्या चक्रव्यूहाची आता चर्चा होत आहे.

| Updated on: Aug 15, 2025 | 10:45 PM
1 / 6

2 / 6
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धावर चर्चा करण्यासाठी पुतिन यांनी स्वारस्य दाखवावे यासाठी ट्रम्प यांनी कधीकधी दबावतंत्र तर कधी मावळ धोरण स्वीकारले. या धोरणाचाच परिणाम म्हणून आता रशियाने अमेरिकेसोबत चर्चेची तयारी दाखवली आहे.

3 / 6
रशियाला कोंडीत पकडण्यासाठी ट्रम्प यांनी अगोदर पुतिन यांना कडक इशारा दिला. एकीकडे त्यांनी रशियावर अनेक निर्बंध लावायला सुरुवात केली. रशियाशी व्यापार करणाऱ्या भारतावरही टॅरिफ लावून रशियाची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

4 / 6
आता ट्रम्प यांनी अलास्का येथील बैठक सकारात्मक न राहिल्यास रशियाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असाही इशारा दिला आहे. युद्धविरासंदर्भात ट्रम्प यांनी रशियाला अगोदर 50 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर ही मुदत 10 ते 12 दिवसांपर्यंत कमी करण्यात आली.

5 / 6
दुसरीकडे रशियासोबत चर्चा करण्यास सोईचे ठरावे यासाठी अमेरिकेने रशियावरील काही निर्बंध तात्पुरत्या स्वरुपात कमीदेखील केले. अमेरिकेतील वित्त मंत्रालयाने नुकतेच 13 ऑगस्ट रोजी रशियन अधिकाऱ्यांना 20 ऑगस्टपर्यंत अमेरिकेत येण्याची परवानगी दिलेली आहे.

6 / 6
म्हणजेच ट्रम्प यांनी रशियाला चर्चेच्या टेबलावर आणण्यासाठी कधी मवाळ तर कधी कठोर धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांच्या धोरणाचा नेमका काय परिणाम होणार? रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध थांबणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.