
तुम्ही भारताचा इतिहास शिकताना बादशाहा शाहजहानचे नाव ऐकलेच असेल. भारतावर राज्य करणारा हा एक महत्त्वाचा मुघल राजा होता. त्याने भारतात अनेक महत्त्वपूर्ण इमारतींची निर्मिती केलेली आहे.

शाहजहानने दिल्लीतील लाल किल्ला बांधलेला आहे. सोबतच आग्र्यातील ताजमहलदेखील शाहजहाननेच बांधलेला आहे. दिल्लीतील लाल किल्ल्याप्रमाणेच त्याने आग्र्यातही आग्रा किल्ल्याची निर्मिती केली होती.

शाहजहान हा राजा फारच महत्त्वाकाक्षी असा राजा होता. त्याचा जन्म 5 जानेवारी 1592 रोजी लाहोर येथे झाला होता. अनेकांना शाहजहानच्या राजवटीबद्दल कल्पना आहे. मात्र शाहजहानचे खरे नाव नेमके काय आहे, याबद्दल अनेकांना कल्पना नाही. त्याचे नाव फारच मोठे आणि उच्चार करण्यास अवघड आहे.

बादशाहा शाहजहानचे नाव मिर्झा साहबउद्दीन बेग मुहम्मन खान खुर्रम असे आहे. शाहजहान हा मुघल बादशाहा जहांगीरचा सर्वात लहान मुलगा होता.

सिंहासन मिळावे यासाठी शाहजहानने 1622 साली उठाव केला होता. मात्र त्यात याला यश आले नाही. पुढे 1627 साली जहांगीरच्या निधनानंतर शाहजहानने आपले सासरे आसफ खान यांच्या मदतीने सिंहासन सांभाळले.

शाहजहानचा राज्याभिषेक 24 फेब्रुवारी 1628 रोजी आग्रा येथे झाला होता. शाहजहानचे निधन 22 जानेवारी 1966 रोजी आग्रा येथे झाले.