WhatsApp युजर्ससाठी मोठी खुशखबर! ग्रुपची लिमिट 1024वरुन तब्बल… जुन्या ग्रुपचं काय होणार?
व्हॉट्सॲप युजर्ससाठी मोठी बातमी! आता एका ग्रुपमध्ये 1024 ऐवजी 1500 सदस्य जोडता येणार आहेत. अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर ही सुविधा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, जुन्या ग्रुपची मर्यादाही आपोआप वाढणार आहे.

WhatsApp ने ग्रुपमधील मेंबर्सची मर्यादा 1024 वरून वाढवून 1500 केली आहे. अँड्रॉइड आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर ही सुविधा उपलब्ध होणार आहे. ग्रुप आणि कम्युनिटी ग्रुप चॅटसाठीही हा बदल लागू करण्यात येत आहे.
मोठ्या कुटुंबांचे ग्रुप, सोसायटी, शाळा आणि ऑफिसमधील ग्रुपमध्ये अनेकदा मेंबर्सची संख्या 1024 पेक्षा जास्त होते. त्यामुळे वेगळा ग्रुप तयार करावा लागत होता. आता एका ग्रुपमध्ये 1500 जणांना जोडता येणार असल्याने ही अडचण दूर होईल.
WhatsApp वरील सध्याच्या ग्रुपची मर्यादाही आपोआप वाढणार आहे. यासाठी ग्रुप अॅडमिनला वेगळी सेटिंग करण्याची गरज नाही. अपडेट मिळाल्यानंतर जुन्या ग्रुपमध्ये आणखी 476 मेंबर्स जोडता येतील.
ग्रुपमध्ये महत्त्वाचे मेसेज वर ठेवण्यासाठी पिन मेसेज फीचर उपलब्ध आहे. याशिवाय मेंशन आणि रिप्लायच्या आधारे चॅट फिल्टर करता येतात. नव्याने ग्रुपमध्ये सहभागी झालेल्या मेंबर्सना आधीचे निवडक मेसेज पाहण्याची सुविधाही मिळते.
1500 मेंबर्सची मर्यादा अँड्रॉइड आणि iOS वरील काही युजर्ससाठी रोलआउट झाली आहे. मात्र, ही सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध केली जात आहे. त्यामुळे सर्व युजर्सना लगेच हा बदल दिसणार नाही. येत्या काही आठवड्यांत अधिक युजर्सना ही सुविधा मिळण्याची शक्यता आहे.