
श्वेता तिवारी तिच्या व्यक्तीगत आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. मग ते तिचं पहिलं लग्न असो किंवा दुसरं. दोन घटस्फोटानंतर श्वेता आता आपल्या मुलांसह आयुष्य व्यतीत करतेय. श्वेता तिवारी वयाच्या 44 व्या वर्षी सुद्धा फिट आहे. सोशल मीडियावर ती तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते.

श्वेता तिवारीचा फॅशन सेन्स नेहमीच चर्चेचा विषय असतो. तिचा फिटनेस पाहून तिला लोक मुलगी पलकची मोठी बहिण बोलतात. नेहमीच कमेंट सेक्शनमध्ये यूजर्स श्वेताच कौतुक करत असतात. फॅन्सच्या मते वाढत्या वयासोबत श्वेता अजून तरुण होत चालली आहे.


श्वेता तिवारीच नाव वरुण कस्तूरियासोबत जोडलं गेलेलं. दोघांनी एक फोटो शेअर केलेला. यात दोघे परस्परांच्या खूप जवळ दिसत होते. लोकांनी श्वेता आणि वरुणचे फोटो पाहून तिला खूप काही सुनावलेलं.

श्वेता तिवारीसोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये वरुण कस्तूरियाने कॅप्शनमध्ये 'मदर एंड सन' लिहिलं होतं. सीरियल 'अपराजिता' मध्ये श्वेता आणि वरुणने एकत्र काम केलेलं. श्वेता शो मध्ये अभिनेत्याच्या सासूच्या भूमिकेत होते.