AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केवल महिलांसाठी आहेत हे 5 गॅझेट्स, जीवनास बनवतील एकदम सोपे

स्मार्ट गॅझेट्स प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. मात्र, काही गॅझेट्स विशेषतः महिलांच्या गरजांसाठी खास डिझाईन केले आहेत. येथे असे पाच गॅझेट्स पाहूयात, जे महिलांचे जीवन सोपे आणि सुव्यवस्थित करतात.

केवल महिलांसाठी आहेत हे 5 गॅझेट्स, जीवनास बनवतील एकदम सोपे
5 Best Gadgets For Women
| Updated on: Feb 01, 2026 | 11:11 PM
Share

5 Best Gadgets For Women: टेक्नोलॉजीमुळे आपले जीवन सुसह्य केले आहे. महिलांच्या दैनंदिन कामकाजासाठी असे अनेक गॅझेट्स आले आहेत. जे महिलांसाठी खूपच उपयोगी ठरले आहेत. हेल्थ, फिटनेस, किचन मॅनेजमेंट आणि पर्सनल केअरपर्यंत, प्रत्येक क्षेत्रात स्मार्ट डिव्हाईस मदत करत असते. येथे असे 5 गॅझेट्स आपण पाहणार आहोत जे महिलांना रोजच्या कामासाठी येतील.

पोर्टेबल कॉर्डलेस हीटिंग पॅड

पोर्टेबल कॉर्डलेस हीटिंग पॅड महिलांसाठी खूपच उपयोगी ठरणार आहेत. पीरियड्स दरम्यान वेदना किंवा क्रॅम्प येऊ शकते, ही खूपच मदत होऊ शकते. जास्त डिव्हाईस वेगवेगळ्या हीट लेव्हल आणि मसाज मोड मिळतो. कॉर्डलेस असल्याने यास महिला चांगल्या प्रकारे वापरु शकतात. घर, ऑफीस वा प्रवासा दरम्यान हे गॅझेट्स आराम देऊ शकणारे हे गॅझेट छोटे असले तरी मोठ्या कामाचे आहे.

लेबल मेकर मशीन

लेबल मेकर मशीन कामाचे डिव्हाईस आहे. यामुळे महिला किचन कंटेनर, फाईल, बॉक्स आणि स्टोरेज आयटमवर स्वच्छ आणि टीकाऊ लेबल लावता येऊ शकतात. त्यामुळे घरकाम करणारी गृहीणी असो की ऑफीस काम करणारी महिला दोन्ही आपल्या वस्तू शोधणे सोपे जाते.किचन स्टोरेज, स्डडी, कार्यालय कुठेही या लेबल मेकर मशीनचा वापर करता येतो. आणि यामुळे वस्तू पटकण सापडतात वेळ देखील वाचतो.

हेल्थ ट्रेकिंग स्मार्टवॉच

स्मार्टवॉच आता केवळ वेळ पाहण्याचे उपकरण उरलेले नाही. आता पर्सनल हेल्थ ट्रॅकर म्हणून याचा वापर होतो. यात फिटनेस ट्रॅकींग, हार्ट रेट मॉनिटरिंग, स्लीप डेटा आणि एक्टीव्हीटी रेकॉर्ड सारख्या सुविधा मिळतात. अनेक मॉडेलमध्येय महिलांसाठी खास हेल्थ ट्रॅकींग फिचर्स उदा. पीरियड ट्रॅकर सारखी सुविधा मिळते. हे फिचर महिलांसाठी खूपच युजफुल असते. जे लोक फिटनेस आणि हेल्थ डेटावर नजर ठेवू इच्छीतात त्यांच्यासाठी हे उपयुक्त गॅझेट आहे.

टच स्क्रीन व्हॅनिटी मिरर

टच स्क्रीन व्हॅनिटी मिरर ब्यूटी आणि पर्सनल केअरसाठी स्मार्ट अपग्रेड मानले जाते. यात एलईडी लाईट्स आणि डिमेबल ब्रायटनेस कंट्रोल मिळतो. ज्यास वेगवेगळ्या लाईट्स कंडीशनमध्ये चेहरा स्वच्छ पाहाता येतो. मेकअप, स्कीन केअर, वा क्लोज डिटेल्स पाहण्यासाठी हे खूपच मदतगार आहे. टच कंट्रोलच्या कारणामुळे याचा वापर करणे सोपे असते. जे लोक ग्रुमिंगवर जास्त लक्ष देतात त्यासाठी ही चांगली गुंतवणूक आहे.

ज्वेलरी क्लीनर

ज्वैलरी क्लीनर एक असे स्मार्ट गॅझेट आहे ज्यामुळे घरच्या घरी अंगठ्या, घड्याळे आणि अन्य ज्वेलरी स्वच्छ करता येते. त्यामुळे सोनाराकडे जाण्याचा त्रास वाचतो. यासाठी पैसे देखील लागतात. या डीव्हाईसमुळे तुम्ही घरीच दागिने आणि इतर वस्तू स्वच्छ करु शकता. या मशिनच्या अल्ट्रासॉनिक तरंगांच्या मदतीने दागिन्यातील फटी आणि नाजूक भागातील घाण आणि धुळ मळ स्वच्छ होतो. यामुळे जास्त मेहनती शिवाय ज्वेलरी पुन्हा नव्यासारखी चमकू शकते. यामुळे हे गॅझेट खूपच उपयोगाचे आहे.

( डिस्क्लेमर: या गॅझेट्स महिलांच्या गरजा पाहून डिझाईन केले आहे. परंतू याचा उपयोग कोणीही करु शकतो. सुविधा, आरोग्य आणि मॅनेजमेंटशी संबंधित लोक या डिव्हाईसचा उपयोग करु शकतात.)

Follow Us
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ...
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ....
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक...
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक....
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना...
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना....
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल.
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त....
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त.....
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला..
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला...
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत.
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत...
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत....
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक.
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!.