
तब्बूने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात वयाच्या 14 व्या वर्षीच केली होती. तिने बॉलिवूडपासून साऊथच्या चित्रपटांमध्ये काम केलं. आजही तब्बूचा टॉपच्या अभिनेत्रींमध्ये समावेश होतो.

तब्बूने आपल्या काळातील अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केलय. 80-90 च्या दशकात तब्बू त्यावेळचा मोठा स्टार जॅकी श्रॉफसोबत कधीच मोठ्या पडद्यावर दिसली नाही. त्यामागे एक मोठं कारण आहे. एकदा पार्टीमध्ये जॅकीने तब्बूसोबत घाणेरडी कृती केली होती. त्यामुळे तब्बू खूप घाबरलेली.

तब्बूचा अभिनेत्री बनण्याचा कुठलाही प्लान नव्हता. तिला एअर होस्टेस बनायचं होतं. वयाच्या 14 व्या वर्षी ‘हम नौजवान’ चित्रपटातून तिने बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. तेलुगु चित्रपट कुली नंबर 1 मधून लीड अभिनेत्री म्हणून 1991 साली तिने डेब्यु केला. हिंदी सिनेमात प्रमुख अभिनेत्री म्हणून 1994 साली विजयपथ चित्रपटातून करिअरची सुरुवात केली.

जॅकी श्रॉफी आणि तब्बूचा जो किस्सा आम्ही सांगतोय तो तब्बूने लीड अभिनेत्री म्हणून डेब्यु करण्याच्या आधीचा आहे. 1986 चा तो काळ होता. तब्बू मोठी बहिण फराह नाज सोबत ‘दिलजला’ (1987) शूटिंग करत होती. चित्रपटात प्रसिद्ध विलन डॅनी डेंग्जोंग्पा सुद्धा होता. चित्रपटाचं मॉरिशेसमध्ये चित्रीकरण सुरु होतं. त्यावेळी फराहसोबत 16 वर्षांची तब्बू सुद्धा होती.

एकदिवस डॅनीने पार्टी ठेवली. त्यात चित्रपटाची पूर्ण टीम आणि तब्बू सुद्धा होती. पार्टीत जॅकी श्रॉफ भरपूर दारु प्यालेला. दारुच्या नशेत त्याने तब्बूला किस करण्याचा प्रयत्न केला. तब्बू त्यावेळी खूप घाबरली. त्यावेळी डॅनी तिथे आला आणि जॅकीला ओढत खोलीत घेऊन गेला. त्यानंतर जॅकी आणि तब्बूने कुठल्याही चित्रपटात एकत्र काम केलं नाही.