
घर बांधताना अनेकजण वास्तूशास्त्राच्या नियमांना फार महत्त्व देतात. काही लोक तर घरातील वस्तूदेखील वास्तूशास्त्रानुसारच ठेवतात.

घरात कॅलेंडर लावण्यासाठीचीही वास्तूशास्त्राचे काही नियम आहेत. पश्चिम दिशेला कॅलेंडर लावल्यास ते शुभ मानले जाते.

उत्तर दिशादेखील चांगली आहे. ही दिशा भगवान कुबेराची दिशा मानली जाते. या दिशेला कॅलेंडर ठेवल्यास धनसंपत्ती तसेच समृद्धी येते असे मानले जाते.

दक्षिण दिशा ही कॅलेंडर लावण्यासाठीची अशुभ दिशा आहे, असे मानले जाते. मुख्य दरवाजाजवळ तसेच दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावू नये असे सांगितले जाते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.