
कलिंगड : कलिंगड शरीराला थंडावा देते, म्हणून हिवाळ्यात ते खाल्ल्याने सर्दी किंवा घसा खवखव वाढू शकते. त्यात जास्त पाण्याचे प्रमाण थंड हवामानात शरीराचे तापमान कमी करते.

खरबूज : खरबूज देखील शरीराला थंडावा देणारं फळ आहे. हिवाळ्यात जेव्हा पचनशक्ती कमकुवत असते तेव्हा हे फळ पचण्यास कठीण होऊ शकते. ते श्लेष्मा वाढवते, ज्यामुळे सर्दी देकील होऊ शकते.

अननस : अननस हे संवेदनशील फळ आहे. हिवाळ्यात जास्त प्रमाणात हे फळ खाल्ले तर घसा खवखवणे, तोंड येणे किंवा ऍलर्जी अशा समस्या निर्माण होऊ शकतात. हिवाळ्यात त्याचे जास्त सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होऊ शकतो

केळी : थंड हवामानात केळीमुळे श्लेष्मा वाढू शकतो आणि सकाळी केळी खाल्ल्यानंतर अनेकांना जडपणा जाणवतो. हिवाळ्यात त्यांचे सेवन मर्यादित करणे चांगले.

द्राक्षे : द्राक्षे शरीराला थंडावा देतात आणि अनेकदा खोकला आणि सर्दी होऊ शकतात. त्यांच्यातील साखरेचे प्रमाण जास्त असल्याने हिवाळ्यात जास्त प्रमाणात सेवन करणे नुकसानकारक ठरू शकते.

हिवाळ्यात कोणती फळे खावीत? हिवाळ्यात सफरचंद, संत्री, पेरू, डाळिंब आणि किवी यांसारखी फळे खावीत. ही फळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, व्हिटॅमिन सी समृद्ध असतात आणि शरीराला आतून उबदारपणा आणि ऊर्जा प्रदान करतात.