अंबानींच्या मुलांना ट्रेनिंग देणारा एकातासाचे घेतो 25 हजार, कोण आहे सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना? वॉचमन ते 15 कोटीच्या जीमचा मालक

विनोद चन्ना एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधला नावाजलेला सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे. सध्या तो अंबानी कुटुंबाला ट्रेनिंद देतोय. याआधी त्याने जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन सारख्या मोठ्या स्टार्सचा फिटनेस ट्रेनर म्हणून काम केलं आहे. एका इंटरव्यूमध्ये विनोद त्याच्या स्ट्रगलच्या दिवसांबद्दल बोलला. विनोदने सांगितलं की, तो एका गरीब कुटुंबातून येतो.

| Updated on: Jan 20, 2026 | 5:17 PM
1 / 5
त्याने आपल्या करिअरची सुरुवात वॉचमन म्हणून केली होती. पण बॉडीबिल्डिंगच्या आवडीमुळे त्याने फिटनेस ट्रेनिंगकडे मोर्चा वळवला. अनेक वर्षांच्या त्याच्या मेहनतीचा परिणाम आहे की, तो आज अंबानी सह मोठ्या स्टार्सना ट्रेनिंग देतोय.

2 / 5
हा त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. त्याने कधी विचार केला नव्हता की, करिअरमध्ये कधी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चनचा फिटनेस ट्रेनर म्हणून काम करण्याची संधी मिळेल.

3 / 5
 बॉडीबिल्डर असल्यामुळे वांद्र्यात एका जीम मॅनेजरने त्याला संधी दिली. इथून त्याचा सेलिब्रिटी ट्रेनर बनण्याचा प्रवास सुरु झाला.  वांद्र्यात झीरोपासून सुरुवात केली. कोणीही क्लायंट नव्हता. जीममध्ये जे मिळायचं, त्याने ट्रेनिंग द्यायचो.

4 / 5
त्यानंतर रितेश देशमुखने मला पाहिलं आणि एका अभिनेत्याला मला रेकमेंड केलं. रितेशसोबत मी वर्ल्ड टूरवर सुद्धा गेलो होतो. फिल्म फोर्ससाठी विनोदने जॉन अब्राहमला ट्रेन केलं.

5 / 5
त्यावेळी मी माझ्या करिअरच्या पीकवर होतो. एका तासासाठी 25 हजार रुपये चार्ज करायचो. त्यावेळी अनन्या बिर्लाने माझ्याशी संपर्क साधला. त्यावेळी मी 16 तास काम करायचो. त्याच कमाईतून मी 5-6 घरं खरेदी केली. 15 कोटीची जीम विकत घेतली. विनोद यांनी ईशा अंबानी, अनंत अंबानी आणि आकाशा अंबानी यांना फिटनेस ट्रेनिंग दिली आहे.