
रिएलिटी शो बिग बॉस मल्याळमची सध्या खूप चर्चा आहे. मोहनलालच्या या शो मध्ये दिवंगत अभिनेता-कॉमेडियन कोल्लम सुधीची पत्नी रेणू सुधी स्पर्धक म्हणून सहभागी झालेली. कोल्लम गेल्यानंतर रेणूच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. तिला सायबर बुलीचा सामना करावा लागला. स्वत:ला संपवण्याचा विचार सुद्धा तिच्या मनात आलेला.

रेणू सुधी कोण आहे?. रेणू अभिनेत्री, युट्यूबर आणि इंटरनेट सेनसेशन आहे. ती कोल्लम सुधीची दुसरी पत्नी आहे. कोल्लमच अचानक अपघाती निधन झालं. त्यानंतर ती चर्चेत आलेली. रेणूने विधवा महिलांसाठी आखलेले समाजाचे नियम मानायला नकार दिलेला. आपल्या अटींवर आयुष्य जगायचं असं तिने ठरवलं.

कोल्लमच्या मृत्यूनंतर काही काळाने रेणूने बोल्ड फोटोशूट केलं. यावरुन तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. रेणू त्यामुळे इतकी वैतागलेली की, आत्महत्येचे विचार तिच्या मनात यायचे. इतकच नाही रेणूबद्दल असं सुद्धा म्हटलं गेलेलं की, कोल्लमच्या मृत्यूनंतर तिने मुलाला एकट्याला सोडून दिलय. हे ती सहन करु शकली नव्हती.

मला समजत नाहीय की, मी काय चुकीच करतेय. मला असं का वाटतं, मी जे काही करते, तो गुन्हा आहे. मी खरच कंटाळली आहे असं रेणू म्हणालेली.

मला असं वाटतं, माझ्याजवळ दोनच पर्याय आहेत, एक आयुष्य संपवणं आणि दुसरं पुन्हा लग्न. मी दुसऱ्या लग्नाचा विचार केलेला नाही. पतीच्या मृत्यूनंतर मी जे काही करते किंवा बोलते, ते चुकीचं आहे का?. मला फक्त आपलं आयुष्य जगायचं आहे असं रेणूने म्हटलेलं.