Who is Sachin Ahir Wife : सचिन अहिर यांच्या पत्नी कोण? त्या काय करतात? त्यांचं लग्न कसं जुळलं?

Who is Sachin Ahir Wife : सचिन अहिर आज सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. आठवड्याभरापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सहा खासदार फुटले होते. आता सचिन अहिर यांच्या रुपाने आमदार फुटल्याने चर्चा होणं स्वाभाविक आहे.

| Updated on: Jun 30, 2026 | 4:39 PM
1 / 5
सचिन अहिर हे मूळचे कामगार क्षेत्रातले. अरुण गवळी यांचा भाच ही सुद्धा त्यांची एक ओळख. कामगार क्षेत्रात काम करताना त्यांनी राजकारणात प्रवेश केला. शरद पवार यांच्या पक्षाकडून ते आमदार, मंत्री झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचें मुंबई शहर अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं.

सचिन अहिर हे मूळचे कामगार क्षेत्रातले. अरुण गवळी यांचा भाच ही सुद्धा त्यांची एक ओळख. कामगार क्षेत्रात काम करताना त्यांनी राजकारणात प्रवेश केला. शरद पवार यांच्या पक्षाकडून ते आमदार, मंत्री झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचें मुंबई शहर अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं.

2 / 5

सचिन अहिर हे राजकीय, कामगार क्षेत्रात सक्रीय असताना 2000 साली त्यांचं संगीता यांच्याबरोबर लग्न झालं. सचिन अहिर राजकीय क्षेत्रात कार्यरत होते, तर संगीता अहिर या चित्रपट क्षेत्रात सक्रीय होत्या. आजही त्या चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत.

3 / 5

सचिन अहिर आणि संगीता यांना एक मुलगी असून तिचं नाव ऐश्वर्या आहे. 2002 साली मुलीचा जन्म झाला. मुलीचं शिक्षण लंडनला झालं. तिथे ती पॉलिटिकल सायन्स विषयात करिअर घडवत आहे. सचिन आणि संगीता अहिर एकाच शाळेत होते. पुढे त्यांचे मार्ग वेगळे झाले. पण नंतर एका कार्यक्रमात भेट झाली. पुन्हा गाठीभेटी वाढल्या. मग दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

4 / 5

सचिन अहिर आणि संगीता यांनी मिळून संकल्प प्रतिष्ठाचनी स्थापना केली. या माध्यमातून हे दाम्पत्य समाजकार्यही करतं. संकल्प प्रतिष्ठान लोकांच्या लक्षात आहे ते दहीहंडी उत्सवामुळे. वरळीच्या जांबोरी मैदानावर दहीहंडी उत्सव दणक्यात साजरा व्हायचा. दरवर्षी सलमान खान या दहीहंडी उत्सवाला हमाखास हजेरी लावायचा.

5 / 5

संगीता अहिर यांची मंगलमुर्ती फिल्मस नावाची चित्रपट निर्मिती संस्था आहे. त्या चित्रपट निर्मात्या आहेत. कॅलेंडर गर्ल्स (2015), दगडी चाळ (20150), टोटल धमाल (2019), मुंबई सागा (2021) चा चित्रपटांची निर्मिती त्यांच्या प्रोडक्शन हाऊसतर्फे करण्यात आली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us