
नागार्जुन यांचा मुलगा अखिल अक्किनेनी याने मंगळवारी साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. भाऊ नाग चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाआधीच अखिलने साखरपुडा उरकला आहे. झैनाब रावदजी असं त्याच्या होणाऱ्या पत्नीचं नाव आहे.

झैनाब रावदजी ही उद्योगपती झुल्फी रावदजी यांची मुलगी आहे. झुल्फी यांचं बांधकाम व्यवसायात मोठं नाव आहे. त्यांचा मुलगा झैन रावदजी हे ZR रिन्युएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.

झैनाब ही एक कलाकार असून ती भारत, दुबई आणि लंडन अशा तिन्ही देशात राहिली आहे. तिच्या कलेत सर्जनशीलता आणि संस्कृतीबद्दलचं प्रेम दिसून येतं. झैनाब तिच्या पेंटिंग्ससाठी विशेष ओळखली जाते.

अखिल हा नागार्जुन आणि त्यांची दुसरी पत्नी आमला यांचा मुलगा आहे. त्यामुळे नाग चैतन्य हा त्याचा सावत्र भाऊ आहे. अखिलने याआधी 2016 मध्ये श्रिया भुपालशी साखरपुडा केला होता. 2017 मध्ये दोघं लग्न करणार होते. मात्र लग्नापूर्वीच त्यांचा साखरपुडा मोडला.

अखिलचा सावत्र भाऊ नाग चैतन्य दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी तो दुसरं लग्न करणार आहे. याआधी त्याने समंथा रुथ प्रभूशी पहिलं लग्न केलं होतं.