‘दुनियादारी’चित्रपटातील सुरेखा 13 वर्षांनंतर आता कशी दिसते? फोटो पाहून व्हाल चकित

13 वर्षांपूर्वी दुनियादारी चित्रपटात दिसणारी सुरेखा आता कशी दिसते? फोटो पाहून तुम्हाला देखील बसणार नाही विश्वास.

| Updated on: Aug 16, 2026 | 8:32 PM
1 / 5
2013 साली प्रदर्शित झालेल्या संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप पाडली. या चित्रपटातील दिग्या आणि सुरेखा या भूमिका विशेष गाजल्या.

2013 साली प्रदर्शित झालेल्या संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप पाडली. या चित्रपटातील दिग्या आणि सुरेखा या भूमिका विशेष गाजल्या.

2 / 5

दिग्याची भूमिका साकारणारा अंकुश चौधरी आजही मनोरंजनसृष्टीत सक्रिय आहे. मात्र, सुरेखाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रिचा परयाली गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीपासून दूर होती.

3 / 5

आता तब्बल 13 वर्षांनी रिचाने पुन्हा मराठी चित्रपटात काम केलं आहे. तिचा आगामी चित्रपट ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ असून विशेष म्हणजे या सिनेमात ती पुन्हा एकदा अंकुश चौधरीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

4 / 5

या चित्रपटाच्या टीमने रिचा आणि अंकुशचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत दोघेही वर-वधूच्या वेशात दिसत असून त्यांचा हा लूक पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. त्यामुळे चित्रपटात दोघांचं लग्न झाल्याचं पाहायला मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

5 / 5

फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनीही भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. फायनली दिग्याला सुरेखा पटली, ही सुरेखा दिग्याला पटलेली हाय, अशा कमेंट्स करत चाहत्यांनी या जुन्या जोडीचं पुन्हा स्वागत केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us