अमेरिकेत लोक मोठ्या घरासमोर एक छोटं घर का बांधतात? कारण ऐकूनच तुम्ही…
अमेरिकेत अनेकजण त्यांच्या मोठ्या घराच्या समोर किंवा आसपास एक छोटं घर का बाधतात? नेमकं हे घर बांधण्यामागे काय कारण? उत्तर ऐकून तुम्ही व्हाल थक्क.

अमेरिकेत अनेक घरांच्या मागील अंगणात मुख्य घरापासून वेगळं असलेलं एक छोटंसं घर पाहायला मिळतं. या घराला सामान्यतः गेस्ट हाऊस किंवा बॅकयार्ड हाऊस म्हटलं जातं. मात्र, हे घर केवळ पाहुण्यांसाठीच बांधलं जात नाही तर त्यामागे अनेक उपयोगी कारणं आहेत.
अमेरिकेत अनेक कुटुंबं नातेवाईक किंवा मित्र घरी आल्यानंतर त्यांच्या राहण्याची सोय करण्यासाठी छोटं घर बांधतात. त्यामुळे पाहुण्यांना स्वतंत्र जागा मिळते आणि मुख्य घरात गर्दी होत नाही.
काही कुटुंबं वृद्ध आई-वडील किंवा मोठ्या झालेल्या मुलांसाठी अशी स्वतंत्र घरं तयार करतात. यामुळे कुटुंब एकाच परिसरात राहतं, पण प्रत्येकाला स्वतःची गोपनीयता आणि मोकळीक मिळते.
काही जण या छोट्या घराचं रूपांतर खासगी जिम, ऑफिस, स्टुडिओ किंवा अभ्यासाच्या खोलीत करतात. तर काही जण मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी किंवा शांतपणे आराम करण्यासाठी त्याचा वापर करतात.
या घराचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यातून उत्पन्न मिळू शकतं. स्थानिक नियम आणि परवानग्या लागू असल्यास, काही घरमालक ही जागा भाड्याने देतात. त्यामुळे त्यांना अतिरिक्त कमाईचा स्रोत उपलब्ध होतो.