GK : पहिला आणि शेवटचा, ब्रेडचे 2 स्लाईस का असतात वेगळे ? नेहमी खाणाऱ्यांनाही माहीत नसेल हे कारण

Why bread slices are different: तुम्ही कदाचित नियमितपणे ब्रेड खात असाल, पण ब्रेडचा पहिला आणि शेवटचा स्लाईस वेगळा का असतो, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का ? आणि त्याचं पॅकिंग अशाप्रकारे का केलेलं असतं ? चला घेऊया जाणून

| Updated on: Apr 27, 2026 | 2:16 PM
1 / 7
आजकाल बहुतांश लोकं ब्रेड खातात. 15 दिवसांतून किंवा आठवड्यातून एकदा तरी ब्रेड खाल्ला जातो. जर तुम्ही कधी ब्रेडचं पॅकेट उघडलं असेल, तर तुमच्या लक्षात आलं असेल की त्यातले पहिला आणि शेवटचा स्लाईस, बाकीच्या स्लाईसपेक्षा थोडे वेगळे दिसतात. ब्रेडचा पहिल व शेवटचा स्लाईस रंगाने थोडा गडद असतो , त्याच्या कडा कडक असतात आणि त्यांचा आकारही वेगळा असतो. बऱ्याच लोकांना ते स्लाईस खायवा आवडत नाहीत आणि त्यामुळेचे हे स्लाईस सहसा बाजूला ठेवले जातात. पण ब्रेडचे हे स्लाइस असे बनवण्यामागेही विशेष, रंजक कारण आहे. (All Photos : Getty Images)

2 / 7
आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी फारसा विचार न करता वापरतो. पण जेव्हा त्या  सामान्य वस्तू बारकाईने पाहतो, तेव्हा आपल्याला त्यामागील विज्ञान आणि त्याचं उपयोग लक्षात यतो. पाव आणि केक हे असेच पदार्थ आहेत, जे आजकाल प्रत्येक स्वयंपाकघराचा भाग असतात, पण त्यांच्या रचनेमागेही एक विशेष विचार, कारण असतं.

3 / 7
सँडविच, टोस्ट, बर्गर किंवा गोड पदार्थांमध्ये ब्रेड आणि केकचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ते सर्व वयोगटातील लोकांना आवडतात. पण फार कमी लोकांना हे माहीत असेल की ब्रेडच्या पॅकेटमधील पहिली आणि शेवटची स्लाइसही वेगळी असण्यामागे काही चूक नव्हे तर खास कारण असतं, तो बेकिंग प्रक्रियेचा एक नैसर्गिक परिणाम असतो.

4 / 7
जेव्हा ओव्हनमध्ये ब्रेड किंवा केक भाजला जातो, तेव्हा त्याची पुढची आणि मागची बाजू उष्णतेच्या अधिक थेट संपर्कात येते. हे भाग तापमानाच्या अधिक संपर्कात येत असल्यामुळे, ते लवकर शिजतात. यामुळे कडेचे काप अधिक गडद आणि थोडे कडक होतात, तर मधले काप मऊ आणि स्पंजसारखे राहतात.

5 / 7
आता प्रश्न असा निर्माण होतो की, इतक्या वेगळ्या दिसणाऱ्या ब्रेडच्या अशा कडा, कंपनी काढून का टाकत नाहीत? खरं सांगायचं तर, हे स्लाईस , पॅकेटममधील उर्वरित पावासाठी संरक्षक कवचासारखे काम करतात. ब्रेडच्या आतल्या,  मऊ तुकड्यांना बाहेरील वातावरणापासून हे स्लाईसेस वाचवतात आणि त्यामुळेच आतल्या स्लाईसचा ओलावा टिकून राहतो.

6 / 7
पाव उघडल्यानंतर कडेचे हे काप देखील खूप उपयोगी पडतात. ते  हवा नआत पोहोचण्यापासून रोखतात, ज्यामुळे मधले स्लाईस हे लवकर सुकत, कोरडे पडत नाही नाहीत. यामुळेच पाव जास्त काळ ताजा आणि मऊ राहतो.

7 / 7
म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला ब्रेडचा पहिला किंवा शेवटचा तुकडा वेगळा दिसेल, तेव्हा तो निरुपयोगी समजून फेकून देण्यापूर्वी त्याचे महत्त्व लक्षात ठेवा. तो केवळ वेगळा दिसणारा एक तुकडा नाही, तर ते एक नैसर्गिक संरक्षक कवच असतं, ज्यामुळे पाव ताजा राहतो.

Follow Us