Dimples: गालावरची खळी तुझ्या…वेड लावणारी खळी सर्वांच्या का नाही गाली? डिंपल पडण्याचं कारण काय?

Dimples Interesting Facts: गालावर खळी पडणारी व्यक्ती मोहक आणि आकर्षक दिसते. गालावर खळी पडली तर त्या व्यक्तीकडे आपोआप लक्ष वेधते. पण गालावर खळी का पडते? डिंपल येतात कुठून, का पडते गालावर खळी? काय आहे त्यामागील कारण?

| Updated on: Jan 21, 2026 | 5:10 PM
1 / 6
Dimples Interesting Facts: गालाच्या एका बाजूला अथवा दोन्ही बाजूला खळी पडते. ही खळी पडणारी स्त्री सुंदर आणि मनमोहक भासते. पुरुषांच्याही गालाला खळी पडते, तेव्हा तो शोभून दिसतो. चारचौघात अशी व्यक्ती जरा  जास्तीचा भाव खाऊन जाते. चेहरा अधिक आकर्षक दिसत असल्याने एका स्माईलनेच अनेकांचं काळजी घायळ होतं.

2 / 6
सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्रींच्या गालाला खळी पडते. काहींनी तर खळी पडावी यासाठी नाना उपाय केल्याचे ऐकवते. अनेक सिनेतारकांना ही खळी रंगत आणते. त्यांच्या मनमोहक हस्य खळीमुळे खुलते. तो मनमोहक चेहरा डोळ्यासमोरून हटतच नाही.अनेकांची इच्छा असते की आपल्या गालावर एका बाजूला का असेना पण खळी पडावी. पण ही खळी पडते तरी कशी?

3 / 6
काही तज्ज्ञांच्या मते गालावर खळी पडणे ही अनुवांशिक क्रिया आहे. म्हणजे वडील अथवा आई, आजी अथवा आजोबा कुणा एकाकडून खळी दुसर्‍या पिढीला लाडानं कोपरखळी मारते. अर्थात हे एक कारण आहे. त्यासाठी एक स्नायू जबाबदार असल्याचा पण एक दावा करण्यात येतो. त्याआधारे गालावर खळी पडते असे मानल्या जाते.

4 / 6
एक स्नायू हा इतर स्नायूंपेक्षा तुलनेत लहान असतो अथवा दोन भागात विभागला जातो. त्यामुळे स्माईल केल्यावर गालांवर खड्डा पडोत. या स्नायुला जायगोमॅटिकस मेजर असं म्हणतात. म्हणजे ज्यावेळी ती व्यक्ती हसते अथवा चेहऱ्याची मोठी हालचाल करते, तेव्हा एक विशेष स्नायू आकुंचन पावतो आणि त्या ठिकाणी लहानसा खड्डा तयार होतो. तिथंच अनेकांचा जीव अडकतो.

5 / 6
केवळ गालावरच नाही तर अनेकांच्या हनुवटीवर पण खळी पडते. म्हणजी ती व्यक्ती हसली अथवा तिने चेहऱ्यावर हसरे भाव आणले की आपसूकच ही खळी तिथे दिसते. काहींच्या मते जेव्हा बाळ आईच्या पोटात असतं. तेव्हा बाळाची उजव्या आणि डाव्या बाजूचं हनुवटीचं हाडं जुळत नाही आणि मग हनुवटीवर खळी पडते.

6 / 6
विशेष म्हणजे काहींच्या गालावर लहानपणी खळी दिसते. पण कालांतराने अशा लोकांच्या गालावरील अथवा हनुवटीवरील खळी नाहिशी होते. एकतर फॅट नष्ट झाल्याने अथवा फॅट वाढल्याने असा प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांची खळी मोठी आणि खोल असते. ती आयुष्यभर टिकते. तर काहींची चरबी वाढल्याने नष्ट होण्याची शक्यता असते.