लाल किंवा पांढरा, पॅकिंगसाठी फक्त ब्राऊन बॉक्सच का वापरले जातात ?

ऑनलाइन डिलिव्हरी असो किंवा घरातील सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवायचे असो, बहुतांश पॅकेजिंग बॉक्स तपकिरी रंगाचेच का दिसतात? ते रंगीत का नसतात? जाणून घेऊया कारण...

| Updated on: Sep 21, 2026 | 8:13 PM
1 / 7
ऑनलाइन एखादी वस्तू मागवताना किंवा घरातील सामान पॅक करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवताना सर्वत्र दिसणारी एक गोष्ट म्हणजे—  ब्राउन रंगाचा कार्टन बॉक्स. बॉक्स लहान असो किंवा मोठा, पॅकेजिंगसाठी बहुतांश वेळा हाच रंग वापरला जातो. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की हे बॉक्स नेहमी तपकिरी रंगाचेच का असतात ? त्यांना इतर कोणचाही आकर्षक रंग कालदिला जात नाही ? पण प्रत्यक्षात, या रंगामागे कागद तयार करण्याची नैसर्गिक प्रक्रिया, उत्पादन खर्च, बॉक्सची मजबुती आणि रिसायकलिंग यांसारखे महत्त्वाचे घटक आहेत.

ऑनलाइन एखादी वस्तू मागवताना किंवा घरातील सामान पॅक करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवताना सर्वत्र दिसणारी एक गोष्ट म्हणजे— ब्राउन रंगाचा कार्टन बॉक्स. बॉक्स लहान असो किंवा मोठा, पॅकेजिंगसाठी बहुतांश वेळा हाच रंग वापरला जातो. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की हे बॉक्स नेहमी तपकिरी रंगाचेच का असतात ? त्यांना इतर कोणचाही आकर्षक रंग कालदिला जात नाही ? पण प्रत्यक्षात, या रंगामागे कागद तयार करण्याची नैसर्गिक प्रक्रिया, उत्पादन खर्च, बॉक्सची मजबुती आणि रिसायकलिंग यांसारखे महत्त्वाचे घटक आहेत.

2 / 7

कार्टन बॉक्स सामान्यतः ‘क्राफ्ट पेपर’ (Kraft Paper) पासून तयार केले जातात. हा कागद लाकडाच्या तंतूंपासून म्हणजेच सेल्युलोजपासून तयार होतो. कागद तयार करण्याच्या प्रक्रियेदरम्यान त्याला रासायनिक ब्लिचिंग करून पूर्णपणे पांढरा करण्याऐवजी त्याचा नैसर्गिक रंग कायम ठेवला जातो. लाकडाच्या पल्पच्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे क्राफ्ट पेपरचा रंग फिकट तपकिरी किंवा मातीसारखा दिसतो. म्हणजेच हा तपकिरी रंग वेगळा लावलेला रंग नसून कागदाचीच नैसर्गिक ओळख आहे.

3 / 7

महागड्या गिफ्ट बॉक्स किंवा कॉस्मेटिक उत्पादनांचे पॅकेजिंग अतिशय चमकदार आणि रंगीबेरंगी असते. मात्र, दैनंदिन वापरातील वस्तूंच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बॉक्सचा मुख्य उद्देश सामान सुरक्षित ठेवणं हा असतो. त्यामुळे अशा बॉक्सवर चमकदार फिनिशिंग किंवा रंग देण्याची आवश्यकता नसते. मात्र जर असे बॉक्सही रंगीत किंवा पांढरे बनवले, तर अतिरिक्त रासायनिक प्रक्रिया, ब्लिचिंग, शाई आणि कागदाचा खर्च वाढतो. मोठ्या प्रमाणावर पॅकेजिंग करणाऱ्या कंपन्यांसाठी हा खर्च आर्थिकदृष्ट्या महाग ठरू शकतो.

4 / 7

कार्टन बॉक्स तपकिरी ठेवण्यामागचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांची मजबुती. क्राफ्ट पेपरमधील लांब आणि मजबूत तंतू जड वजन वाहून नेण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. याच कागदाचे अनेक थर एकत्र करून ‘कोरुगेटेड कार्डबोर्ड’ (Corrugated Cardboard) तयार केला जातो. त्यामध्ये सपाट थरांच्या मध्ये लहरी किंवा तरंगाच्या आकाराचा एक थर ठेवला जातो. हा थर वाहतुकीदरम्यान सामानावर येणारा दबाव आणि धक्के सहन करण्यास मदत करतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणे, पुस्तके, कपडे आणि ऑनलाइन ऑर्डर केलेल्या वस्तूंच्या डिलिव्हरीसाठी असे बॉक्स मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.

5 / 7

पण प्रत्येक बॉक्स तपकिरी रंगाचाच असावा असे बंधन नाही. अनेक ब्रँड्स आपल्या प्रमोशन आणि ब्रँडिंगसाठी लाल, निळा, काळा, पांढरा किंवा इतर रंगांमध्ये प्रिंटिंग करून घेतात. काही बॉक्स पूर्णपणे रंगीतही असतात. तरीही साध्या पॅकेजिंगसाठी नैसर्गिक क्राफ्ट पेपर हा स्वस्त, उपयुक्त आणि टिकाऊ पर्याय ठरत असल्यामुळे ब्राउन बॉक्सचे वर्चस्व कायम दिसतं.

6 / 7

तपकिरी कार्डबोर्ड बॉक्सचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे त्याचं तुलनेनं सोपं रिसायकलिंग. वापरलेल्या जुन्या पुठ्ठ्यापासून पुन्हा नवीन कागद किंवा पेपर-बोर्ड तयार केला जाऊ शकतो. मात्र, केवळ रंगावरून रिसायकलिंग ठरत नाही. बॉक्सवर लावलेलं प्लास्टिक कोटिंग, टेप आणि गोंद यांसारखे घटकही महत्त्वाचे असतात. तरीही सामान्य तपकिरी कार्डबोर्डच्या रिसायकलिंगसाठी जगभरात मोठी व्यवस्था उपलब्ध आहे.

7 / 7

दशकांपासून पॅकेजिंगमध्ये तपकिरी बॉक्स वापरले जात असल्यामुळे लोकांच्या मनात एक मानसिक प्रतिमा निर्माण झाली आहे की तपकिरी रंगाचा बॉक्स म्हणजे त्यामध्ये एखादी वस्तू सुरक्षितपणे पॅक केलेली असते. त्यामुळे रंगीत पॅकेजिंगच्या आजच्या युगातही कमी किंमत, टिकाऊपणा, पर्यावरणपूरकता आणि मजबूत बांधणी यांमुळे साधा तपकिरी कार्टन बॉक्स जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us