
निळ्या साडीमध्ये एका रात्रीत नॅशनल क्रश बनलेली मराठी अभिनेत्री आणि सौंदर्य क्वीन गिरिजा ओक आता तिच्या लुकमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

रविवार 11 जानेवारी रोजी गिरिजा ओकने महाराष्ट्र् राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये अनेक प्रश्न गिरिजा ओकने फडणवीसांना विचारले.

मात्र, ही मुलाखत सुरु होण्याआधीच अभिनेत्री गिरिजा ओकने मुख्यमंत्री फडणवीस यांची माफी का मागितली. काय आहे नेमकं कारण? जाणून घेऊयात सविस्तर

पुण्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून संवाद पुणेकरांशी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी तिने मुलाखत सुरु होण्याआधी फडणवीसांचं स्वागत केलं.

ती फडणवीसांना म्हणाली की, मला पुणेकरांच्या वतीने तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. पण मनात भिती आहे. कारण मी पुण्याची नसून पुण्याची सून आहे.

कारण माझ्या समोर सर्व सासरची मंडळी बसली आहे. त्यामुळे काही चूक-भूल झाली तर आताच मी माफी मागते. याच मुळे ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.