
पाकिस्तान सोबत झालेल्या एका युद्धा दरम्यान एक अनोखी घटना घडली होती. या युद्धासाठी भारतीय लष्कराने मोठ्या संख्येने कंडोम खरेदी केले होते.अखेर भारतीय सैन्याला इतक्या मोठ्या प्रमाणावर कंडोम खरेदी करण्याची आवश्यकता का पडली पाहूयात.. काय आहे ही विचित्र घटना याची माहिती घेऊयात.

ही घटना ३ डिसेंबर १९७१ दरम्यानची आहे. ३ डिसेंबर रोजी पाकिस्तान आणि भारतात सुरु झालेले हे युद्ध १६ डिसेंबर रोजी संपले. यावेळी पाकिस्तानी सैन्याने भारतीय एअरबेसला टार्गेट केले होते..

युद्धाच्या रणनिती नुसार भारतीय सैन्याला चटगांव बंदरावर हल्ला करायचा होता. आणि पाकिस्तानी नौकांना उद्धवस्त करण्याची योजना भारतीय सैन्याने आखली होती.

या नौकाला नष्ट करण्यासाठी त्यांच्या खाली limpet mine नावाचा भुसुंरुग लावण्याची योजना होती. परंतू हा माईन पाण्याशी संपर्क होताच ३० मिनिटांत ब्लास्ट होतो ही अडचण होती.

त्यामुळे limpet mine भुसुरुंगाला पाण्यापासून वाचविण्यासाठी भारतीय सैन्याने कंडोम खरेदी करण्याचा निर्णय घेतला, आणि त्यातून हे limpet mine भुसुरुंग समुद्रात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पाकच्या युद्ध नौकांना उडविण्यात आले. भारतीय वायू सेनेचेही मोठे योगदान होते.