गरमागरम सूपसोबत कुरकुरीत नूडल्स का दिले जातात? कोणताही शेफ सांगत नाही तुम्हाला हे सिक्रेट

हॉटेलमध्ये सूपसोबत मिळणारे तळलेले नूडल्स केवळ चवीसाठी नसून त्यामागे रंजक वैज्ञानिक कारणे दडलेली आहेत. या नूडल्सची भूमिका काय असते, हे जाणून घ्या.

| Updated on: Mar 29, 2026 | 3:22 PM
1 / 8
आपण हॉटेलमध्ये गेल्यावर आवडीने मन्चाऊ किंवा इतर चायनीज सूपची ऑर्डर देतो, तेव्हा त्यासोबत तळलेले कुरकुरीत नूडल्स हमखास दिले जातात. अनेकदा आपण ते केवळ चवीसाठी किंवा आवडीने सूपमध्ये मिसळतो.

आपण हॉटेलमध्ये गेल्यावर आवडीने मन्चाऊ किंवा इतर चायनीज सूपची ऑर्डर देतो, तेव्हा त्यासोबत तळलेले कुरकुरीत नूडल्स हमखास दिले जातात. अनेकदा आपण ते केवळ चवीसाठी किंवा आवडीने सूपमध्ये मिसळतो.

2 / 8

मात्र, सूपसोबत दिले जाणारे हे ड्राय नूडल्स देण्यामागे केवळ प्रेझेन्टेशन किंवा चव वाढवणे इतकाच उद्देश नसतो. तर त्यामागे एक रंजक वैज्ञानिक दृष्टिकोन आणि ग्राहकांच्या सुरक्षेचा विचारही दडलेला आहे.

3 / 8

हे कुरकुरीत नूडल्स का दिले जातात? यामुळे सूप पिण्याचा अनुभव नेमका कसा सुरक्षित होतो? आणि यामुळे जेवणाची चव कशी वाढते, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

4 / 8

सूप हे सहसा गरमागरम सर्व्ह केले जाते. अनेकदा घाईघाईत सूप पिताना जीभ भाजण्याची शक्यता असते. तज्ज्ञांच्या मते, सूपमध्ये नूडल्सचा थर असल्याने आपण थेट सूप पिण्याऐवजी आधी नूडल्स चमच्याने उचलतो.

5 / 8

यामुळे सूप किती गरम आहे याचा अंदाज आपल्याला येतो आणि वाफेमुळे तुमची जीभ भाजण्याचा त्रास टाळता येतो. नूडल्स एका बॅरियरसारखे काम करतात, ज्यामुळे तुम्ही सूप सावधगिरीने पिता.

6 / 8

सूप हे पूर्णपणे द्रव असते. त्यात हे तळलेले नूडल्स टाकल्यामुळे एक वेगळा कुरकुरीतपणा येतो. मऊ सूप आणि कडक नूडल्स हे मिश्रण जिभेला एक वेगळा अनुभव देते. यालाच पाककलेच्या भाषेत टेक्चरल कॉन्ट्रास्ट असे म्हणतात.

7 / 8

जेव्हा तुम्ही सूपच्या वाटीवर नूडल्स टाकता, तेव्हा ते सूपमधील उष्णता बाहेर पडण्यापासून रोखतात. नूडल्सचा हा थर इन्सुलेशनसारखे काम करतो, ज्यामुळे तुमचे सूप शेवटच्या घोटापर्यंत गरम राहण्यास मदत होते.

8 / 8

मन्चाऊ सारखी सूप्स खूप तिखट आणि आंबट असतात. तळलेले नूडल्स चवीला सौम्य असतात. जेव्हा तुम्ही ते तिखट सूपमध्ये मिसळता, तेव्हा ते सूपचा अति-तिखटपणा कमी करतात. ज्यामुळे सूप अधिक चविष्ट लागते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us