GK : घोडा बसत का नाही? उभा राहूनच घेतो झोप; अजब कारण वाचून चकित व्हाल!

घोडा कधीही एका जागेवर बसत नाही. तो उभा राहूनच आराम करतो. पण तो न बसण्यामागचे कारण अनेकांना माहिती नाही.

| Updated on: Dec 28, 2025 | 6:39 PM
1 / 5
घोडा हा असा प्राणी आहे जो अतिशय देखणा आणि बलशाली असतो. धावण्याच्या शर्यतीत त्याचा कोणीही हात धरू शकत नाही. त्याचा धावण्याचा वेग पाहता अनेक राजे-महाराजे घोड्यावर बसूनच प्रवास करायचे. आजघडीला काही घोड्यांची किंमत ही करोडो रुपये आहे.

2 / 5
घोडा या प्राण्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. यातीलच एक वैशिष्ट्य म्हणजे घोडा फारच कमी वेळा बसतो. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की घोडा उभा राहूनच झोपी जातो. तसेच तसेच उभा असलेल्या स्थितीतच तो आरामही करतो. याच कारणामुळे घोडा बसत का नाही? असे विचारले जात आहे.

3 / 5
घोडा फारच कमी वेळा बसतो. त्याची शारीरिक रचना यास कारणीभूत आहे. घोड्याचा मणका हा सरळ आणि लांब असतो. त्यामुळे त्याला फार काळासाठी बसता येत नाही. घोडा बसला किंवा खाली पूर्ण झोपला तर त्याच्या पोटावर आणि फुफ्फुसावर दबाव पडतो. त्यामुळेच घोटा शक्यतो बसत नाही. तो उभा असतानाच आराम करतो.

4 / 5
जास्त काळ बसून राहिल्यास घोड्याला श्वास घ्यायलाही त्रास होतो. त्यामुळेदेखील घोडा फार वेळेसाठी बसत नाही. उभा राहूनच आराम करणे त्याच्यासाठी सोईचे, सुरक्षित आणि आरामदायी असते. दुसरे कारण म्हणजे जीविताला धोका पोहोचू नये यासाठीदेखील घोडा बसण्याचे टाळतो.

5 / 5
(टीप- या स्टोरीतील माहिती प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली आहे. अधिक माहितीसाठी तसेच कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधा.)