
धार्मिक मान्यतेनुसार, दरवर्षी पितृ पक्षात आपले पूर्वज 15 दिवसांसाठी पृथ्वीवर येतात. त्यांना आपल्या वंशजांकडून अपेक्षा असते की, ते श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान आदि करतील. अशावेळी पितरांच श्राद्ध घातलं नाही, तर ते दु:खी होतात. शाप देऊन आपल्या लोकात परत जातात.

म्हणून दरवर्षी पितृ पक्षात पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्राद्ध केलं जातं. मार्कण्डेय पुराणानुसार, ज्या कुळात श्राद्ध विधी केला जात नाही, तिथे दीर्घायु, निरोग आणि वीर संतान जन्म घेत नाही.ना कुटुंबात काही मंगल होतं.

गरुड पुराणानुसार, जर पितरांच श्राद्ध केलं नाही,तर दिवंगत आत्मा प्रेत योनीमध्ये राहू शकतात. त्यामुळे कुटुंबाला वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सोबतच पितृ दोष लागू शकतो. त्यामुळे आरोग्य, धन आणि नात्यांमध्ये अडचणी येतात.

धार्मिक मान्यता आहे की, पितृ पक्षात श्राद्ध केलं नाही, तर पितरांची आत्मा तृप्त होत नाही.ते असंतुष्ट राहतात. त्यामुळे पितृ दोष लागतो. सोबतच घरात आर्थिक अडचणी व अन्य प्रकारची संकटं येऊ शकतात.

दरवर्षी पितृ पक्षात पूर्वजांसाठी श्राद्ध केलं नाही, तर पितृ दोष लागतो. संतानाची समस्या आणि कुटुंब दोष लागतो.म्हणून पितृ पक्षात पितरांसाठी श्राद्ध करणं आवश्यक आहे.