तुमच्या स्मार्टफोनच्या खालच्या बाजूला लहान छिद्र का असते? 99 टक्के तुम्हाला माहिती नसेल कारण

तुमच्या स्मार्टफोनच्या खालच्या बाजूला असणारे लहान छिद्र केवळ डिझाइन नसून ते एक महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे. हे छिद्र नेमके काय काम करते आणि त्याची काळजी कशी घ्यावी, याबद्दलची रंजक माहिती.

| Updated on: Mar 25, 2026 | 2:50 PM
1 / 8
आजकाल स्मार्टफोन प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. पण जर तुम्ही कधी नीट पाहिलंत तर फोनच्या खालच्या किंवा वरच्या बाजूला सुईच्या टोकासारखी अतिशय लहान छिद्रे दिसतात.

आजकाल स्मार्टफोन प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. पण जर तुम्ही कधी नीट पाहिलंत तर फोनच्या खालच्या किंवा वरच्या बाजूला सुईच्या टोकासारखी अतिशय लहान छिद्रे दिसतात.

2 / 8

अनेकांना वाटते की हे केवळ डिझाइन आहे किंवा फोन रिसेट करण्याचे बटण आहे. पण तांत्रिक भाषेत याला नॉइज-कॅन्सिलिंग मायक्रोफोन असे म्हणतात. हे लहान छिद्र तुमच्यासाठी किती महत्त्वाचे असते, याबद्दल जाणून घेऊया.

3 / 8

जेव्हा आपण फोनवर बोलतो, तेव्हा फोनमधील मुख्य मायक्रोफोन आपला आवाज टिपतो. त्याच वेळी, हे लहान छिद्र (दुसरा मायक्रोफोन) आपल्या सभोवतालचा गोंगाट, जसे की ट्रॅफिकचा आवाज, वारे किंवा लोकांची बडबड रेकॉर्ड करते.

4 / 8

फोनमधील स्मार्ट तंत्रज्ञान या दोन्ही आवाजांची तुलना करून बॅकग्राउंडचा अनावश्यक आवाज काढून टाकते. परिणामी, समोरच्या व्यक्तीला तुमचा आवाज कोणत्याही अडथळ्याशिवाय स्पष्टपणे ऐकू येतो. आताच्या आधुनिक स्मार्टफोनमध्ये आता दोन किंवा तीन छिद्रे दिलेली असतात.

5 / 8

यातील पहिलं छिद्र प्राथमिक मायक्रोफोन असून त्याद्वारे आपला आवाज स्पष्टपणे पकडला जातो. त्यानंतर दुसरे छिद्र नॉइज कॅन्सलेशन म्हणजेच सभोवतालचा गोंगाट कमी करण्यासाठी आणि तिसरे छिद्र डायरेक्शनल ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना त्या दिशेचा आवाज अचूकपणे टिपण्यासाठी असते.

6 / 8

अनेकदा स्वस्त किंवा चुकीच्या मापाचे कव्हर वापरल्यामुळे ही छिद्रे झाकली जातात. यामुळे कॉलवर बोलताना समोरच्या व्यक्तीला तुमचा आवाज घुमल्यासारखा किंवा अस्पष्ट ऐकू येतो.

7 / 8

हे छिद्र सिम ट्रे उघडण्याच्या छिद्रासारखेच दिसते. घाईघाईत जर तुम्ही सिम पिन या मायक्रोफोनच्या छिद्रात खुपसली, तर आतील नाजूक पडदा (Microphone Layer) खराब होऊ शकतो. एकदा हा लेयर फाटला की तुमच्या फोनचे नॉइज कॅन्सलेशन फीचर कायमचे बंद होऊ शकते.

8 / 8

त्यामुळे, स्मार्टफोनमधील ही लहान छिद्रे किरकोळ वाटत असली तरी फोनवर बोलताना ते मोठी भूमिका बजावतात. त्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us