का आहे सांडणीच्या दुधाला एवढी मागणी? जाणून घ्या दुधाचे औषधी गुणधर्म

| Updated on: Jan 07, 2022 | 10:36 PM

सध्या सांडणीच्या (Camel Milk)दुधाला मोठ्याप्रमाणात मागणी आहे. सांडणीच्या दुधामध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणर्धम असल्यामुळे या दुधाची किंमत देखील अधिक आहे. हे दूध 2500 रुपये प्रति लिटर पेक्षा अधिक दराने विकते.

1 / 5
सध्या सांडणीच्या (Camel Milk)दुधाला मोठ्याप्रमाणात मागणी आहे. सांडणीच्या दुधामध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणर्धम असल्यामुळे या दुधाची किंमत देखील अधिक आहे. हे दूध  2500 रुपये प्रति लिटर पेक्षा अधिक दराने विकते. या दुधामध्ये असे कोणते गुणधर्म आहेत की ज्यामुळे या दुधाला एवढी मागणी आहे,  या दुधाचे दर इकते जास्त का आहेत?  या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.

2 / 5
300 टन सांडणीच्या दुधाचे उत्पादन : बिझनेस इनसाइडरच्या एका रिपोर्टनुसार दरवर्षी जगभरात सांडणीच्या दुधाचे केवळ 300 टन एवढेच उत्पादन होते. प्राप्त आकडेवारीनुसार दरवर्षी जगभरात गाईच्या दुधाचे उत्पादन तब्बल 600 मिलियन टन एवढे होते. गायीच्या दुधाच्या तुलनेमध्ये सांडणीच्या दुधाचे उत्पादन हे खूपच कमी असल्यामुळे त्या दूधाला प्रचंड किंमत मिळते.

3 / 5
सोमालिया, केनियामध्ये सर्वाधिक उत्पादन: सांडणीच्या दुधाचे सर्वाधिक उत्पादन हे सोमालिया आणि केनिया या दोन देशांमध्ये होते. एकूण दुधाच्या उत्पादनापैकी सुमारे 64 टक्के उत्पादन हे या दोन देशांमध्ये होते. या देशामध्ये सांडणीच्या दुधाचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो. या दुधाने इथे अनेकांना रोजगार मिळून दिला आहे.

4 / 5
सांडणीच्या दुधाचे उपयोग - सांडणीच्या दुधामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. या दुधामध्ये कोणत्याही इतर दुधापेक्षा व्हिटॅमीन सीचे प्रमाण हे  दहा टक्के अधिक असते. पोटॅशियमचे प्रमाण देखील मोठ्याप्रमाणात असते. त्यामुळे या दुधाला मोठी मागणी आहे. अनेक सैंदर्यप्रसाधनांमध्ये सांडणीच्या दुधाचा उपयोग होतो. तसेच अनेक आजारांमध्ये देखील सांडणीचे दूध गुणकारी असल्यामुळे या दुधाला मोठी मागणी असते.

5 / 5
व्यवसायिक दृष्टीकोणातून सांडणी पालन - सांडणीच्या दुधाला मोठी  मागणी तर आहेच, सोबत प्रचंड दराने हे दूध विकले जाते. दुधासोबत उंटांची देखील पैदास केली जाते. हे उंट विकून देखील चांगले पैसे मिळतात. उंटाला किंवा सांडणीला विशेष अशा चाऱ्याची आवश्यकता नसते. या सर्व गोष्टींचा विचार करून अनेक लोक आता उंट पालनाकडे वळले आहे. त्यांना या व्यवसायातून वर्षाकाठी चांगला नफा मिळतो.