
ब्रह्मांडात काही ग्रहांवर जीवनमान असू शकते असा अंदाज वर्तवला जातो. पण त्यात अजूनतरी काही तथ्य नाही. पृथ्वीसारखाच शुक्र हा एक ग्रह आहे. पण या ग्रहावर जीवनमान असण्याची शक्यताच नाही. नासाने एका व्हिडीओच्या माध्यमातून याचं कारण सांगितलं आहे. (फोटो-Pixabay)

नासाचे प्लॅनेटरी शास्त्रज्ञ डॉ. एनी हॉफमॅन यांच्या मते पृथ्वीचं तापमान 60 फारेनहाइट म्हणजेच 15 डिग्री सेल्सियस आहे. शुक्र ग्रहावरील तापमान यापेक्षा जास्त आहे. (फोटो-Pixabay)

पृथ्वीच्या वातावरणात 78 टक्के नायट्रोजन आहे आणि 20 टक्के ऑस्किजन आहे. यात कार्बनडाय ऑक्साइड ग्रीन हाऊन गॅसचं काम करतं. (फोटो-Pixabay)

सूर्याकडून पृथ्वीवर येणारी किरणांमधून कार्बन डाय ऑक्साइड काही प्रमाणात उष्णता खेचून घेते.दुसरीकडे ओझोनच्या थरामुळे रिफ्लेक्ट होऊन परतात. (फोटो-Pixabay)

शुक्रावर पृथ्वीच्या तुलनेत 2 हजार पट जास्त कार्बनडाय ऑक्साइड आहे. याव्यतिरिक्त सूर्य जवळही आहे. यामुळे या ग्रहावर तापमान जवळपास 465 डिग्री सेल्सियस आहे. (फोटो-Pixabay)