
काही लोकांना मांसाहार खूप आवडतो. चिकन, मटणापासून तयार केलेले वेगवेगळे खाद्यपदार्थ लोकांना खायला आवडतात. विशेष म्हणजे काही गृहीणी, पाककलेची आवड असणारे पुरुष मंडळीदेखील चिकण, मटणापासून चविष्ट आणि रुचकर पदार्थ कसे तयार करता येतील, याचा शोध घेत असतात.

सुट्टी असली की अनेकांच्या घरी हमखास मटणाचा बेत असतो. परंतु मंडळी हे मटण किंवा चिकण जेव्हा घरी येते तेव्हा ते नेहमी काळ्या रंगाच्या पिशवीतच असते. मटण, चिकन नेमही काळ्या रंगाच्या पॉलिथीन बॅगमध्येच का दिले जाते? याचा तुम्ही कधी विचार केलेला आहे का?

भारतात बऱ्याचदा काळ्या रंगाच्या पिशव्या या मांसाहारी अन्न आणि मद्य यांची ने-आण करण्यासाठी वापरल्या जातात. काळा रंग गडद असतो. या रंगामुळे पिशवीच्या आत नेमके काय आहे? हे समोरच्या व्यक्तीला समजत नाही.

आपण जेव्हा चिकन आणि मटण घरी आणतो तेव्हा मटणामध्ये रक्ताचा काही अंश असू शकतो हे रक्त पाहून कदाचित समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू शकते त्यामुळेही चिकन, मटण घरी आणताना काळी पिशवी वारपली जाते.

काळ्या पिशवीमुळे मांसाचा रंग कोणता आहे हे बाहेरून दिसत नाही. काही लोक शाकाहारी असतात. मटण, चिकन दिसलं की शाकाहारी लोकांना वाईट वाटते. त्यामुळेदेखील अनेक लोक काळ्या रंगाच्या पिशवीतच मटण, चिकन आणतात.