तुमची ट्रेन मध्येच किंवा स्टेशनवर बराच वेळ थांबली का? कदाचित असू शकते हे कारण

भारतीय रेल्वेच्या इंजिनमध्ये लोको पायलटसाठी शौचालय नसते, ही अनेक वर्षांपासूनची समस्या आहे. मर्यादित जागा, तांत्रिक आणि सुरक्षिततेच्या कारणांमुळे हे शक्य नाही.

| Updated on: Dec 12, 2025 | 12:12 PM
1 / 8
भारतीय रेल्वेच्या लाखो प्रवाशांना त्यांच्या डब्यांमध्ये शौचालयाची सोय उपलब्ध असते. पण तुम्हाला माहिती आहे का की ट्रेनच्या इंजिनमध्ये लोको पायलट आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी शौचालय उपलब्ध नसते.

2 / 8
अनेक वर्षांपासून ही समस्या कायम आहे. अशा परिस्थितीत, लोको पायलट लांब पल्ल्याच्या प्रवासात नैसर्गिक गरजेच्या वेळी काय उपाययोजना करत असतील, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आज आपण याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

3 / 8
रेल्वे इंजिनमध्ये शौचालय नसण्याची मुख्य कारणे समोर आली आहेत. इंजिनमध्ये खूप मर्यादित जागा उपलब्ध असते. तिथे मोठ्या प्रमाणात यांत्रिक आणि इलेक्ट्रॉनिक प्रणाली बसवलेली असते.

4 / 8
तांत्रिक आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून इंजिनमध्ये पाण्याचा वापर किंवा सांडपाण्याची व्यवस्था करणे धोकादायक ठरू शकते, ज्यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका वाढू शकतो. त्यामुळे इंजिनमध्ये शौचालय नसते.

5 / 8
इंजिनमध्ये शौचालय नसले तरी लोको पायलटने प्रवासात आपली नैसर्गिक गरज पूर्ण करण्यासाठी रेल्वेने काही नियम आणि उपाययोजना निश्चित केल्या आहेत. बहुतांश लोको पायलट आपली ड्युटी सुरू करण्यापूर्वी स्टेशनवर स्वतःला फ्रेश करतात. जेणेकरुन प्रवास सुरु झाल्यानंतर किमान २-३ तास शौचालय वापरण्याची गरज भासणार नाही याची काळजी घेतात. हा रेल्वे प्रोटोकॉलचा एक भाग आहे.

6 / 8
सामान्यतः प्रत्येक ट्रेन काही मिनिटांनी कोणत्या ना कोणत्या स्टेशनवर थांबते. लहान अंतराच्या गाड्यांना दर १-२ तासांनी थांबा मिळतो. तर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना मोठ्या स्टेशनवर २ मिनिटांपासून १५ मिनिटांपर्यंत थांबा असतो. या वेळेत लोको पायलट स्टेशनवरील विशेष शौचालयांचा वापर करतात.

7 / 8
पण जर प्रवासादरम्यान लोको पायलटला त्वरित गरज लागली तर अशावेळी ते तात्काळ नियंत्रण कक्षाला कळवतात. नियंत्रण कक्ष परिस्थितीनुसार, त्यांना पुढील स्टेशनवर अनियोजित थांबा (Unscheduled Halt) घेण्याची परवानगी देतो.

8 / 8
याशिवाय, काही विशिष्ट लांब पल्ल्याच्या आणि मालवाहू गाड्यांच्या बाबतीत, नियंत्रण कक्षाच्या पूर्ण परवानगीने काही सेकंदांसाठी रेल्वे ट्रॅकवर गाडी थांबण्याची व्यवस्था केली जाऊ शकते. अशी परिस्थिती सहसा उद्भवत नाही. तसेच लोको पायलटला पूर्वपरवानगीशिवाय रेल्वे थांबवता येत नाही.