GK : माणसाचा पाय केळीच्या सालीवरून का घसरतो, रंजक कारण एकदा वाचाच!

केळीवर पाय चुकून जरी पडला तरी आपण लगेच घसरून पडतो. परंतु असे का होते, याबाबत अनेकांना माहिती नाही. यामागचे नेमके आणि वैज्ञानिक कारण समजून घेऊ या...

| Updated on: Mar 16, 2026 | 10:42 PM
1 / 5
तुम्ही चित्रपटात किंवा बाजारात अनेकदा एखादी व्यक्ती केळीच्या सालीवर घसरताना पाहिली असेल. कधीकधी तुमच्यासोबतही ही घटना घडलेली असेलच. परंतु हे नेमकं का होतं? यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का?

तुम्ही चित्रपटात किंवा बाजारात अनेकदा एखादी व्यक्ती केळीच्या सालीवर घसरताना पाहिली असेल. कधीकधी तुमच्यासोबतही ही घटना घडलेली असेलच. परंतु हे नेमकं का होतं? यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का?

2 / 5

केळीच्या सालीवरून घसरण्यामागे विज्ञान आहे. जेव्हा एखादी व्यक्तीचा पाय केळीच्या सालीवरून घसरतो तेव्हा केळीची साल आणि जमीन यांच्यातील घर्षण खूप कमी असते. त्यामुळेच तुमच्या ओझ्यामुळे केळीचील घसरते आणि तुम्हीदेखील खाली कोसळता.

3 / 5

केळीच्या सालीच्या वर जेलसारखा द्रवपदार्थ असतो. जेव्हा तुमचा पाय केळीवर पडतो, तेव्हा तुमच्या ओझ्याने हा द्रवपदार्थ केळीच्या सालीतून बाहेर येतो. त्यामुळे घर्षण आणखी कमी होते.

4 / 5

परिणामी तुमचा पाय जास्तच घसरत जातो. या द्रवपदार्थात पाणी, साखर आणि प्रोटीन असते. केळीच्या सालीवरून पाय घसरण्याचे मुख्य कारण घर्षण हेच आहे. वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासानुसार केळीच्या सालीचा घर्षण गुणांक (Friction Coefficient) हा 0.07 एवढा असतो.

5 / 5

सर्वच फळांच्या सालीचा घर्षण गुणांक हा सारखा नसतो. सफरचंदाच्या सालीचा घर्षण गुणांक 0.1 असतो. त्यामुळेच वेगवेगळ्या फळांच्या सालीवर पाय दिल्याने आपले पाय कमी-अधिक प्रमाणात घसरतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us