मॉल आणि थिएटरमध्ये टॉयलेटच्या दरवाजाच्या खाली मोकळी जागा का असते? उत्तर वाचून हैराण व्हाल

तुम्ही अनेकदा मॉल आणि थिएटरमध्ये गेला असाल. या ठिकाणी असणाऱ्या टॉयलेटच्या दरवाजाच्या खालच्या बाजूस मोकळी जागा असते. यामागे काय कारण आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आज आपण या प्रश्नाचे सविस्तर उत्तर जाणून घेणार आहोत.

| Updated on: Aug 02, 2025 | 6:46 PM
1 / 5
साफसफाई- सार्वजनिक ठिकाणी असलेली  टॉयलेट दिवसातून अनेक वेळा स्वच्छ केली जातात. दरवाजाच्या तळाशी असलेल्या जागेमुळे सफाई कर्मचाऱ्यांना दरवाजा न उघडता सफाई करण्यास मदत होते. यामुळे टॉयलेट जलद साफ करता येतात.

2 / 5
इमर्जन्सी- जर एखादा व्यकती टॉयलेटमध्ये बेशुद्ध पडला किंवा त्याची तब्येत बिघडली तर तो खाली असलेल्या जागेतून लगेच दिसतो. त्यामुळे दरवाजा न तोडता त्याला मदत करता येते.

3 / 5
गैरवापर- अनेक वेळा लोक थिएटरमधील टॉयलेटमध्ये धूम्रपान करण्यासाठी किंवा चुकीचे काम करण्यासाठी लपतात. मात्र अशा दरवाजांमुळे या लोकांचा पर्दाफाश होतो.

4 / 5
कमी खर्च- टॉयलेटचा लांब दरवाजा बनवण्यासाठी मोठा खर्च येतो. तसेच टॉयलेटमधील ओलावा आणि पाण्यामुळे दरवाजाचा खालचा भाग लवकर खराब होऊ शकतो. मात्र खाली जागा मोकळी असेल तर दरवाजा खराब होत नाही.

5 / 5
हवा आणि प्रकाश- अशा टॉयलेटमध्ये कमी प्रमाणात हवेता संचार असतो. मात्र दरवाजाची खालची बाजू मोकळी असल्याने हवा आणि प्रकाश चांगला राहतो.