
सबा आपल्या करिअरबद्दल सुद्धा बोलली. "एक अभिनेत्री म्हणून मी खूप स्वार्थी आहे. ज्या व्यक्तिरेखांमध्ये मी पूर्णपणे फिट बसेन असे रोल करायला मला आवडतील"

"एका शहरात राहणाऱ्या मुलीची व्यक्तिरेखा साकारण मला फार वेगळं वाटत नाही. पण कुणाच्या प्रवासाच भाग बनणं, कोणाच्या विश्वात प्रवेश करणं मला जास्त एक्सायटेड वाटतं. मला अशा प्रकारचे रोल करायचे आहेत" असं सबा म्हणाली.

सुजैन खानशी घटस्फोट झाल्यानंतर सबाने ऋतिक रोशनच्या आयुष्यात पुन्हा प्रेम फुलवलं. दोघे दीर्घकाळापासून परस्परांना डेट करतायत.

सबाचा ऋतिकाच्या मुलांसोबतही चांगला बॉन्ड आहे. ती अनेकदा ऋतिक आणि मुलांसोबत आउटिंगला जाते. 39 वर्षाच्या सबाच अजून लग्न झालेलं नाही. ती ऋतिक सोबत आयुष्यातील सुंदर क्षण घालवत आहे.

HT सोबत बोलताना सबा आजाद म्हणाली की, वयाच्या 6 व्या वर्षीच माझ्या पालकांनी मला बसवून सांगितलेलं की, बेटा जर तुझी इच्छा नसेल, तर तुला कधी लग्न करण्याची आवश्यकता नाही. आम्हाला तुझ्याकडून काही अपेक्षा नाहीत. माझ्या कुटुंबाने मी कसं जगावं? यासाठी कधीच दबाव टाकला नाही.