Silver Rate : एका दिवसात 7000 हजारांची वाढ, चांदीला एवढी झळाळी का? अखेर खरं कारण समोर?

गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठे चढउतार होताना पाहायला मिळत आहे. चांदीला तर चांगलीच चकाकी मिळत आहे.

| Updated on: Dec 22, 2025 | 10:01 PM
1 / 5
गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. सोन्याचा भाव सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळेच सोन्यात गुंतवणूक करणारे आज मालामाल झाले आहेत. दुसरीकडे सोन्यापेक्षाही चांदीला झळाळी मिळाली आहे. चांदीचा भाव तर सोन्यापेक्षाही सुस्साट आहे.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार 22 डिसेंबर रोजी चांदीचा भाव 7 हजार रुपयांनी वाढला. गेल्या काही दिवसांपासून चांदीचा भाव सोन्यापेक्षा कितीतरी जास्त वेगाने वाढतो आहे. त्यामुळेच सोन्यासोबतच लोक चांदीमध्येही गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत.

3 / 5
लोक वेगवेगळ्या माध्यमातून चांदीमध्ये गुंतवणूक करत आहेत. भविष्यकालीन बाजाराचा अंदाज घेऊन ही गुंतवणूक केली जात आहे. पण चांदीचा भाव का वाढत आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. अलिकडे औद्योगिक क्षेत्रात चांदीची मागणी वाढली आहे.

4 / 5
सोलार पॅनल, इलेक्ट्रिक व्हेइकल, इलेकट्रॉनिक तसेच ग्रीन एनर्जीशी संबंधित क्षेत्रात चांदीचा वापर वाढला आहे. क्लीन, ग्रीन एनर्जीचा वापर  वाढल्यामुळे चांदींच्या मागणीतही वाढ झालेली आहे. मागणी वाढलेली असताना पुरवठा मर्यादित असल्यामुळे चांदीच्या भावात वाढ होत आहे.

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)