स्मार्टवॉचच्या मागे नेहमी हिरवा लाईट का चमकतो? आतापर्यंत कोणीही सांगितलं नसेल तुम्हाला कारण

स्मार्टवॉचच्या मागे चमकणाऱ्या हिरव्या लाईटमागचं रंजक वैज्ञानिक कारण जाणून घ्या. 'फोटोप्लेथिस्मोग्राफी' तंत्रज्ञान आणि रक्ताभिसरणाचा याच्याशी काय संबंध आहे, याबद्दलची सविस्तर माहिती.

| Updated on: May 31, 2026 | 3:31 PM
1 / 6
आजच्या डिजीटल आणि आधुनिक युगात स्मार्टवॉच हे केवळ वेळ पाहण्याचे साधन न राहता प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे हेल्थ गॅझेट बनले आहे. प्रीमियम ब्रँड असो की बजेट-फ्रेंडली घड्याळ घालता तेव्हा स्मार्टवॉच्या मागचा हिरव्या रंगाचा लाईट सतत चालू-बंद होत असतो.

2 / 6
स्मार्टवॉच कंपन्यांचे डिझाईन वेगवेगळ्या ठेवत असल्या तरी या लाईटसाठी फक्त हिरवा रंग का वापरला जातो? असा प्रश्न अनेकदा आपल्याला पडतो. यामागे एक अत्यंत रंजक वैज्ञानिक कारण दडलेलं आहे.

3 / 6
स्मार्टवॉच तुमच्या शरीरातील नाडीचा वेग (Pulse Rate) आणि हृदयाचे ठोके (Heart Rate) मोजण्यासाठी 'फोटोप्लेथिस्मोग्राफी' (Photoplethysmography - PPG) नावाचे प्रगत तंत्रज्ञान वापरतात. जेव्हा आपले हृदय धडकते, तेव्हा शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रक्ताभिसरण वेगाने होते. या प्रक्रियेत रक्तवाहिन्या (केशवाहिन्या) आकुंचन आणि प्रसरण पावतात, ज्यामुळे त्वचेतील रक्ताच्या प्रमाणात सातत्याने बदल होत असतो.

4 / 6
स्मार्टवॉचचा हा सेन्सर त्वचेतून प्रकाश आत पाठवतो आणि रक्ताच्या प्रवाहावरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाची अचूक नोंद ठेवतो. मानवी रक्तातील हिमोग्लोबिन जेव्हा ऑक्सिजनच्या संपर्कात येते, तेव्हा ते लाल रंगाचे दिसते. विज्ञानाच्या नियमानुसार, कोणतीही लाल रंगाची वस्तू किंवा द्रव हा हिरवा प्रकाश स्वतःमध्ये पूर्णपणे शोषून घेतो.

5 / 6
जेव्हा हृदय धडकते आणि रक्तवाहिन्या रक्ताने पूर्ण भरलेल्या असतात, तेव्हा त्या स्मार्टवॉचमधून बाहेर पडणारा हिरवा प्रकाश वेगाने शोषून घेतात. याउलट, दोन ठोक्यांच्या दरम्यान जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताचे प्रमाण कमी असते, तेव्हा प्रकाश परावर्तित (Reflect) होतो. या शोषून घेतलेल्या आणि परावर्तित झालेल्या प्रकाशाच्या फरकावरून स्मार्टवॉच हृदयाचे ठोके अचूकपणे मोजते.

6 / 6
लाल किंवा इतर रंगांचा प्रकाश त्वचेच्या आणि शरीराच्या खूप खोलवर जाऊ शकतो. याउलट, हिरवा प्रकाश शरीरात फार खोलवर प्रवेश करत नाही. तो केवळ त्वचेच्या पृष्ठभागावरील रक्ताभिसरणाचे अचूक मोजमाप करू शकतो. म्हणूनच, घड्याळ कितीही महाग किंवा स्वस्त असले, तरी कंपन्या फक्त हिरव्या रंगाच्या सेन्सरचाच वापर करतात.

Follow Us