Railway Ticket : रेल्वेच्या तिकिटावर छिद्र का असतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही यामागचं नेमकं कारण?

रेल्वेचे तिकीट काढल्यानंतर तुम्ही पाहिले असेल की तिकिटाच्या दोन्ही बाजूंनी काही छिद्र असतात. परंतु हे छिद्र नेमके का असतात, याबाबत अनेकांना माहित नाही. म्हणून रेल्वेच्या तिकिटावर छिद्र असण्यामागचं लॉजिक जाणून घेऊ या..

| Updated on: Mar 17, 2026 | 3:01 PM
1 / 5
भारतभरात रेल्वेचं मोठं जाळं आहे. रेल्वेतून रोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. आजकाल ऑनलाईन पद्धतीने लगेच रेल्वेचे तिकीट बुक करता येते. परंतु याआधी सगळी रेल्वेची तिकिटे ऑफलाईनच होती.

भारतभरात रेल्वेचं मोठं जाळं आहे. रेल्वेतून रोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. आजकाल ऑनलाईन पद्धतीने लगेच रेल्वेचे तिकीट बुक करता येते. परंतु याआधी सगळी रेल्वेची तिकिटे ऑफलाईनच होती.

2 / 5

रेल्वे विभागाने प्रत्येक काम करण्यासाठी काही नियम घालून दिलेले आहेत. या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. म्हणूनच देशात रोज शेकडो रेल्वे कोणत्याही अडथळ्याविना प्रवास करतात. रेल्वेच्या तिकिटाचेही काही नियम आहेत.

3 / 5

तुम्ही अनेकदा ऑफलाईन तिकीट काढलेले असेल तर तुमच्या तिकिटावर काही छिद्र दिसतात. तिकिटाच्या दोन्ही बाजूंनी हे छिद्र पाहायला मिळतात. हे छिद्र नेमके का असतात? ते कशामुळे तयार होतात, याची अनेकांना कल्पना नसते.

4 / 5

रेल्वेचे तिकीट ज्या मशीनने छापले जायचे, त्याला डॉट मेट्रिक प्रिंटिंग सिस्टीम म्हणतात. याच प्रिटिंग सिस्टीममुळे रेल्वेच्या तिकिटावर दोन्ही बाजूंनी छिद्र असतात. रेल्वेचे तिकीट ज्या कागदावर छापले जाते, त्याला कन्टिन्यूअस पेपर म्हटले जाते.

5 / 5

रेल्वे तिकिटावर असलेल्या छिद्रांना स्प्रोकेट होल असे म्हणतात. या स्प्रोकेटच्या मदतीने प्रिटिंग मशीनमध्ये तिकीट दोन्ही बाजूंनी समान पद्धतीने वर जाते आणि प्रिटिंग योग्य पद्धतीने होते. परिणामी प्रत्येक तिकीट एकसारखे वाटायचे. प्रिंट केलेली अक्षरे वाकडी किंवा तिरपी चापून येत नसत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us