हिवाळ्यात कोणत्या कार्यक्रमांसाठी जाताय! असे ब्लाउज शिवून घ्या, लूक दिसेल स्टायलिश
हिवाळ्यात कडाक्याची थंडी वाजत असल्याने कार्यक्रमात कोणता लूक करायचा असा प्रश्न अनेकांना पडतो... पण तुम्ही काही खास टिप्स फॉलो केल्या की, हिवाळ्यात देखील सुंदर दिसू शकला... तर हिवाळ्यात असे ब्लाउज शिवून घ्या. तुम्हीली स्टायलिश दिसाल...

हिवाळ्यासाठी मखमली कापड सर्वोत्तम आहे. ते एक शाही लुक देते आणि थंडीपासून संरक्षणही करते. तुम्ही प्रिती झिंटाप्रमाणे पूर्ण बाह्यांचा गोल गळ्याचा ब्लाउज शिऊन घेऊ शकता. तुम्ही अनेक साड्यांसोबत काळ्या मखमली ब्लाउजला कॉन्ट्रास्ट करूनही घालू शकता.
हिवाळ्यासाठी, तुम्ही वेगवेगळ्या रंगांमध्ये वेलवेट किंवा ब्रोकेड फॅब्रिकचे काही लांब जॅकेट्स घेऊ शकता. एक नवीन लूक तयार करण्यासाठी हे वेगवेगळ्या साड्यांसोबत परिधान केले जाऊ शकतात. हिना खानने क्रीम रंगाच्या साडीसोबत नारंगी रंगाचा कॉलर असलेला श्रग परिधान केला आहे, ज्यामुळे तिच्या लूकला एक शाही फील येत आहे.
माधुरी दीक्षितचा हा लूक हिवाळ्यासाठीही एक कल्पना म्हणून घेतला जाऊ शकतो. तुम्ही साडीसोबत मॅचिंग फुल स्लीव्ह ब्लाउज शिवून घेऊ शकता आणि त्यावर मॅचिंग जॅकेट जोडू शकता. यामुळे तुमचा लूक युनिक आणि क्लासी दिसेल,
तुमच्याकडे ब्रोकेड किंवा भरतकाम केलेली साडी असल्यास, तुम्ही सोनारिका भदौरियाप्रमाणे बोट नेक पूर्ण बाह्यांच्या ब्लाऊजसोबत ती परिधान करू शकता. यामुळे थंडीपासून तुमचं संरक्षणही होईल. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही बाह्या चुडीदार शिवून घेऊ शकता आणि त्यावर सिक्वेन्स भरतकाम केल्यास ब्लाऊजला आणखीनच सुंदर लुक येईल.
पेप्लम स्टाईलचा ब्लाउज हिवाळ्यासाठी उत्तम आहे. यासाठी तुम्ही अभिनेत्री विद्या बालनकडून प्रेरणा घेऊ शकता. तिने कॉलर असलेला ब्लाउज घातला आहे, ज्याची कंबरपट्टी घेरदार असून त्याला अर्ध्या बाह्या आहेत. अशा प्रकारचा ब्लाउज वेलवेटमध्ये अप्रतिम दिसतो.