तिनं 7 महिन्यांत केलं 25 पुरुषांशी लग्न, कारण समोर येताच सगळ्यांनाच बसला धक्का!

एका 23 वर्षीय महिलेने फक्त 7 महिन्यांत तब्बल 25 पुरुषांशी लग्न केलं आहे. या लग्न करण्यामागचं कारणही धक्कादयक असंच आहे.

| Updated on: May 20, 2025 | 9:02 PM
1 / 7
मध्य प्रदेशातील कालापीपल या गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे राजस्थानच्या पोलिसांनी एका 23 वर्षीय महिलेला अटक करून लग्नाच्या नावाखाली लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 7
पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचे नाव अनुराधा असे आहे. गेल्या सात महिन्यांत तिने 25 वेगवेगळ्या पुरुषांशी लग्न केल्याचा आरोप आहे.  (फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 7
सोबतच या पुरुषांसोबत लग्न करून रोकड, मौल्यवान दागिने लुटल्याचाही तिच्यावर आरोप आहे. वेगवेगळ्या पुरुषांसोबत लग्न करून ती पैसे, दागिने लुटून फरार व्हायची.  (फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 7
याच महिलेने सवाई माधोपूर येथील विष्णू शर्मा यांच्याशी 3 मे रोजी एक तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची सूत्रं हालवली. यातूनच हा प्रकार समोर आला.  (फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 7
सुनिता आणि पप्पू मीणा या एजंट्सने 2 लाख रुपये घेऊन विष्णू शर्मा यांचं अनुराधासोबत लग्न लावलं होतं. 20 एप्रिल रोजी त्यांच्यात कोर्ट मॅरेज झालं होतं.  (फोटो सौजन्य- मेटा एआय)

6 / 7
लग्नाच्या काही दिवसांनंतर म्हणजेच 2 मे रोजी अनुराधा घरातील दागिने, 30 हजारांची रोकड तसेच एक मोबाईल फोन घेऊन घरातून पळून गेली. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता ती मध्य प्रदेशात सापडली.  (फोटो सौजन्य- मेटा एआय)

7 / 7
हे रॅकेट भोपाळ येथून चालवलं जात असल्याचा संशय पोलिसांना आहे. अटक केलेल्या अनुराधाकडून याबाबत अधिक माहिती मिळण्याची अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)