चॅट जीपीटीमुळे नशीब पालटलं, महिलेने जिंकली तब्बल 88 लाखांची लॉटरी!

चॅट जीपीटीमुळे एका महिलेचे नशीब पालटले आहे. या महिलेला तब्बल 88 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. या महिलेची सध्या जगभरात चर्चा होत आहे.

| Updated on: Oct 18, 2025 | 9:36 PM
1 / 6
चॅट जीपीटीमुळे एका महिलेचे नशीब पालटले आहे. या महिलेला चॅट जीपीटीमुळे तब्बल 88 लाखांची लॉटरी लागली आहे. या महिलेचेनाव टॅमी कार्वे असे असून आता या घटनेची जगभरात चर्चा होत आहे.

2 / 6
मिळालेल्या माहितीनुसार चॅट जीपीटीमुळेच कार्वे नावाच्या या महिलेला तब्बल 88 लाखांची लॉटरी लागली आहे. या महिलेने पावरबॉल लॉटरीचे तिकीट ऑनलाईन पद्धतीने खरेदी केले होते.

3 / 6
या महिलेने लॉटरीसाठी चॅट जीपीटीकडे आकडे मागितली होते. चॅट जीपीटीने जे आकडे दिले, त्याच आकड्यांवर या महिलेने लॉटरी लावली. या यशाबद्दल खुद्द टॅमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा जॅकपॉट जास्त असतो, तेव्हाच मी लॉटरी खेळते, असे त्यांनी सांगितले.

4 / 6
तसेच मी चॅट जीपीटीकडे पावरबॉल लॉटरीसाठी काही नंबर मागितले होते. तेच आकडे मी माझ्या तिकिटावर लिहिले. 6 डिसेंबर रोजी झालेल्या ड्रॉमध्ये माझे तिकीट चार पांढऱ्या चेंडूंशी मिळत होते. यामुळे मला थेट 50 हजार डॉलर्स म्हणजेच 44 लाख रुपये मिळाले, असे या महिलेने सांगितले.

5 / 6
तसेच पुढे पावर प्ले ऑप्शन माझी ही लॉटरी 1 लाख डॉलर म्हणजेच 88 लाख रुपयांपर्यंत पोहोचली असेही या महिलेने सांगितले. दरम्यान, आता या महिलेला चॅट जीपीटीने दिलेली साथ आणि तिचे बलवत्तर असलेल्या निशिबाची सगळीकडे चर्चा होत आहे.

6 / 6