
सर्वाधिक वर्ल्ड कप खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा समावेश आहे. सचिनने भारतासाठी वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत सर्वाधिक सिक्स मारले आहेत. 27 सिक्स मारत सचिन पहिल्या क्रमांकावर आहे.

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने वर्ल्ड कपमध्ये 25 सिक्स मारले आहेत. क्रिकेट जगतात दादा म्हणून ओळखला जाणारा गांगुली आपल्या हटके स्टाईलमुळे कायम चर्चेत असायचा.

भारताचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने दोन वन डे वर्ल्ड कप खेळले असून त्याच्याकडे आता संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. वर्ल्ड कपमध्ये रोहितने 23 सिक्सर मारले आहेत.

माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग आपल्या बॅटींग स्टाईलने अनेकांना धडकी भरवायचा. कोणताही बॉलर असूदेत त्याचा कार्यक्रम करायचा हे सेगवागचं ठरलेलं गणित असायचं. सेहवागने वर्ल्ड कपमध्ये 18 सिक्स मारले असून तो चौथ्या स्थानी आहे.

भारताचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार एम एस धोनीने दुसरा वर्ल्ड कप सिक्स मारत जिंकून दिला होता. हा सिक्स कोणीही विसरू शकत नाही. धोनी या यादीमध्ये पाचव्या स्थानी असून त्याने 15 सिक्स मारले आहेत.