सुष्मिता सेन वयाच्या 50 व्या वर्षी अडकणार विवाहबंधनात! अभिनेत्रीचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत
Sushmita Sen on her Marriage : वयाच्या 50 व्या वर्षी लग्नबंधनात अडकणार सुष्मिता सेन, पण कोणासोबत...? अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य सध्या तुफान चर्चेत... सुष्मिता कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे असते चर्चेत...

Sushmita Sen on her Marriage : बॉलिवूडची सुपर अभिनेत्री सुष्मिता सेन हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण सुष्मिता तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा कमी खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री लग्नाबद्दल चर्चेत आली आहे. सुष्मिता 50 वर्षांची झाली आहे पण अभिनेत्री आतापर्यंत लग्न केलं नाही… पण सुष्मिता अभिनेता आणि मॉडेल रोहमन शॉल याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात.
सांगायचं झालं तर, इन्स्टाग्रामवरील लाइव्ह सेशनदरम्यान चाहत्यांसोबत गप्पा मारत असताना सुष्मिता सेन लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. सुष्मिता म्हणाली, “मलाही लग्न करायचं आहे. पण त्यासाठी लग्नाच्या लायक कोणीतरी मिळाला तरी पाहिजे. असंच लग्न होतं का? हृदयाचं नातं हे अत्यंत रोमँटिक असतं असं म्हणतात. मग एखादी व्यक्ती हृदयापर्यंत पोहोचायला तरी हवी. मग लग्नसुद्धा होईल.” पूर्वी देखील अनेकदा सुष्मिता खासगी आयुष्यावर व्यक्त झाली आहे.
सुष्मिता हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, सुष्मिताचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणासोबतच अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं आहे. सुष्मिता म्हणाली होती, ‘माझ्या आयुष्यात आलेले सर्व पुरुष चांगले होते. पण माझ्यासाठी वाईट होते…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
View this post on Instagram
सुष्मिता हिने विक्रम भट्ट याच्यापासून ललित मोदी यांच्यापर्यंत अनेक सेलिब्रिटींना डेट केलं आहे. पण कोणासोबतच अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. गेल्या काही वर्षांपासून सुष्मिता रोहमल शॉल याला डेट करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोघे एकत्र आहेत.
सुष्मिता सेन ही वयाच्या 50 व्या वर्षी देखील एकटीच आयुष्य जगत आहे. अभिनेत्रीने कधीच लग्नाचा विचार केला नाही. आता अभिनेत्री तिच्या दोन मुलींसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. सुष्मिता सेन हिने 2000 मध्ये पहिली मुलगी रेने हिला दत्तक घेतलं. त्यानंतर अभिनेत्रीने दुसरी मुलगी अलीशा हिला 2010 मध्ये दत्तक घेतलं. मुलींसोबत अभिनेत्री फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
