तुम्ही इस्रायलमध्ये 1,00,000 रुपये कमावता, तर भारतात त्याची किंमत किती असेल? ‘ही’ रक्कम ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाच्या बाबतीत इस्रायल ही जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. इस्रायलचे अधिकृत चलन इस्रायली न्यू शेकेल (NIS) आहे, ज्याला सामान्यतः शेकेल म्हणून संबोधले जाते. तर आजच्या या लेखात आपण इस्रायल मध्ये जर 1 लाख कमवत असाल तर भारतीय चलनात रूपांतरीत केल्यावर किंमत किती होते ते जाणून घेऊयात.

जगभरातील अनेक लोकं वेगवेगळ्या देशांमध्ये नोकरीसाठी जात असतात. जेव्हा आपण भारतीय एखाद्या देशात नोकरीसाठी जातो आणि तेथील चलनानुसार पैसे कमवत असतो. अशातच प्रत्येक देशाची चलनाची किंमत वेगळी असते आणि भारतीय चलनानुसार त्याची किंमत बदलत असते हे आपल्या प्रत्येकालाच माहित आहे. अशातच इस्रायलला जाण्याचे किंवा तिथे काम करण्याचे स्वप्न अनेकजण पाहतात. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे भारतीय उत्पन्नाच्या तुलनेत तिथे किती उत्पन्न आहे. इस्रायल हा एक लहान देश आहे, परंतु तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाच्या बाबतीत तो जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. इस्रायलचे अधिकृत चलन इस्रायली न्यू शेकेल (NIS) आहे. ज्याला सामान्यतः शेकेल असे संबोधले जाते. भारत आणि इस्रायलमधील चलन मूल्यांमाएध्ये लक्षणीय फरक आहे, म्हणून लोक अनेकदा विचार करतात की इस्रायलमध्ये चांगले उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्तीचे भारतीय रुपयांमध्ये किती मूल्य असेल. तर, आजच्या लेखात आपण इस्रायलमध्ये 1 लाख रुपये कमवल्याने भारतीय चलनात त्यांची किती किंमत होते? तसेच, भारतीय रुपयाच्या तुलनेत इस्रायली चलन इतके मजबूत का आहे आणि ते तुमच्या खिशावर कसा परिणाम करते? ते जाणून घेऊयात.
इस्रायलचे चलन किती मजबूत आहे?
इस्रायलची अर्थव्यवस्था आकाराने भारतापेक्षा लहान असू शकते, परंतु अनेक कारणांमुळे त्याचे चलन खूप मजबूत मानले जाते. त्याची स्थिर आणि मजबूत अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, संरक्षण आणि नवोन्मेष क्षेत्रातील जलद वाढ, खूप कमी आणि नियंत्रित महागाई, बँक ऑफ इस्रायलची कठोर आणि प्रभावी आर्थिक धोरणे. या सर्व कारणांमुळे, आंतरराष्ट्रीय बाजारात इस्रायली शेकेलची मजबूत पकड आहे, ज्यामुळे तो भारतीय रुपयापेक्षा अनेक पटीने मजबूत आहे. आजच्या घडीला 1 इस्रायली शेकेल म्हणजे अंदाजे 27.92 भारतीय रुपये (INR) म्हणजेच 1 शेकेल म्हणजे अंदाजे 28 रुपये आहे.
इस्रायलमध्ये 1 लाख रुपये कमवले तर भारतीय चलनानुसार त्याची किंमत किती होईल?
जर तुम्ही इस्रायलमध्ये 1 लाख शेकेल कमावता, तर ती रक्कम भारतात 27,92,000 होईल. इस्रायलमध्ये 1 लाख शेकेल कमावल्यास तुम्हाला भारतात अंदाजे 27.92 लाख मिळतील. इस्रायलमध्ये उत्पन्न भारतापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त असू शकते, परंतु इस्रायलमध्ये खर्च देखील भारतापेक्षा जास्त आहे. तरीही, कमाईचे भारतीय रुपयांमध्ये रूपांतर केल्याने ही रक्कम बरीच मोठी बनते. यामुळे तिथे रोजगार किंवा काम करू इच्छिणाऱ्यांसाठी ते एक मोठे आकर्षण बनते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहेत.)
