
भारताजवळ अग्नी, शौर्य, प्रलय आणि ब्रह्मोससारखे घातक क्षेपणास्त्र आहेत. हे क्षेपणास्त्र समुद्र, जमीन, हवेतून अण्वस्त्रांचा मारा करु शकतो. भारताने प्रथम अणूहल्ला न करण्याचे बंधन स्वत:ला घातले आहे. परंतु पाकिस्तानने असा संकल्प केलेला नाही.

अमेरिकेने ऑगस्ट 1945 मध्ये जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर अणूबॉम्ब टाकला होता. त्यात दोन लाख लोकांचा मृत्यू झाला होता. या अणूबॉम्बला लिटिल ब्वॉय आणि फॅट मॅन नाव दिले होते.

जगात 9 देशांकडे अण्वस्त्रे आहेत. त्यात अमेरिकेजवळ सर्वाधिक 5748 अणूबॉम्ब आहेत. रशियाकडे 5580, चीनकडे 500, फ्रॉन्सकडे 290, इंग्लंडकडे 225, भारताकडे 172, पाकिस्तानकडे 170, इस्त्रायलकडे 90 आणि उत्तर कोरियाकडे 50 अणूबॉम्ब आहेत.

अमेरिकेकडे 15 मेगाटनचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात शक्तीशाली अणूबॉम्ब आहे. हा अणूबॉम्ब 1950 मध्ये बनवण्यात आला होता. अमेरिकेने मार्च 1954 मध्ये मार्शल आयलँडवर त्याची चाचणी केली.

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा अणूबॉम्बसुद्धा अमेरिकेकडे आहे. 25 मेगाटनचा हा अणूबॉम्ब आहे. त्याचे अनेक व्हर्जनही तयार करण्यात आले आहे. 1965 मध्ये अमेरिकेने या अणूबॉम्बची चाचणी केली होती.

जगात सर्वात मोठा अणूबॉम्ब रशियाकडे आहे. हा अणूबॉम्ब 50 मेगाटनचा आहे. हा अणूबॉम्ब फुटला तर मोठ्या शहर बेचिराख होणार आहे. जगाच्या इतिहासात हा सर्वात मोठा बॉम्ब आहे. अमेरिकेने हिरोशिमावर टाकलेला अणूबॉम्ब केवळ 15 टन होता.

अमेरिका-रशिया शीत युद्ध सुरु असताना रशियाने 100 टीएनटी शक्ती असणारा बॉम्ब बनवला होता. परंतु या बॉम्बच्या चाचणीमुळे पृथ्वीलाच धोका निर्माण झाला असता. त्यामुळे 50 मेगाटन टीएनटीचा अणूबॉम्बची चाचणी रशियाने 30 ऑक्टोंबर 1961 रोजी केली.