
अनेक जण iPhone 17 प्रो मॅक्स वा सॅमसंग गॅलेक्सी Z फोल्ड सारखे महागडे फोन खरेदी करण्यास घाबरत नाही. पण जगातील या फोनची किंमत ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसेल. कारण या किंमतीत एक दोन नव्हे तर तीन खासगी जेट खरेदी करता येतील.

फाल्कन सुपरनोवा iPhone 6 पिंक डायमंड असा हा स्मार्टफोन आहे. हा जगातील सर्वात महागडा फोन मानल्या जातो. यामध्ये पिंक डायमंड आणि 24 कॅरेट सोन्याचा वापर करण्यात आला आहे. या फोन डिझाईन करण्यासाठी आणि तयार करण्यासाठी 10 आठवड्यांचा कालावधी लागला. या महागड्या फोनमध्ये डायमंड आणि सोनं दोघांचा सुरेख मिलाफ आहे.

हा फोन iPhone 6 ची अद्यायावत आवृत्ती आहे. यामध्ये अनेक बदल करण्यात आल्याने त्याची किंमत गगनाला भिडली आहे. Vertu पोर्टलनुसार, फाल्कन सुपरनोवा iPhone 6 पिंक डायमंडची किंमत 48.5 दशलक्ष अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास 430 कोटी रुपये आहे.

या किंमतीत तर तीन खासगी जेट येतील. एका खासगी जेटची किंमत 100 कोटी ते 140 कोटींच्या दरम्यान असते. या फोनच्या किंमतीत तीन खासगी जेट तर सहज खरेदी करता येतील.

जागतिक स्तरावर खासगी जेट विक्री करणाऱ्या AvBuyers नुसार, या फोनच्या किंमतीत जवळपास तीन खासगी जेट खरेदी करता येतील. तर Vertu पोर्टलने हा जगातील सर्वात महागडा फोन असल्याचे म्हटले आहे.

अर्थात हा महागडा फोन असला तरी त्याचे हार्डवेअर आणि डिस्प्लेत मोठा बदल नाही. यामध्ये iPhone 6 चेच सर्व फीचर्स आहेत. यामध्ये 4.7-इंचाचा रेटिना एचडी डिस्प्ले, Apple A8 चिपसेट आणि 16GB ते 128GB पर्यंतचे इंटरनल स्टोरेज आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलाच रिअर कॅमेरा आणि 1.2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.