
अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप झालाय. लागोपाठ तीन मोठे धक्के बसल्याने अफगाणिस्तान हादरलं आहे. या भूकंपामुळे हजारो नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत.

अफगाणिस्तानमध्ये झालेला भूकंप एवढा मोठा होता की यात दोन हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर गावच्या गावं उद्धवस्त झाली आहेत.

40 किलोमीटर अंतरातील गावांना या भूकंपाचा फटका बसला आहे. यात सहा गावं नष्ट झाली आहेत. 465 घरं मलब्याखाली दबली आहेत. तर 135 घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का अफगाणिस्तानला बसला आहे. तसंच 5.9 आणि 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपही या ठिकाणी झाला आहे.

अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरु आहे. जखमींना उपचार देण्यासाठी यंत्रणाा काम करत आहे. या शिवाय स्थानिकही बचाव कार्यात सहभागी झाले आहेत.