
आज आपण जगातील सर्वात जुन्या रेल्वे स्थानकाबद्दल जाऊन घेऊ या. हे रेल्वे स्टेशन फक्त एक इमारत नाही. गेल्या अनेक दशकांपासून रेल्वे आणि रेल्वे स्थानकांच्या सुरुवातीचा हा एक हयात असलेला पुरावा आहे. या रेल्वेस्थानकाची इमारत आता जर्जर झाली आहे. परंतु ही इमारत अजूनही इतिहासाची साक्ष आहे.

हे रेल्वेस्थानक इग्लंडमधील काऊंटी येथे असून त्याला Heighington Station अइसे म्हटले जाते. हे एक जगात हयात असलेले सर्वाधिक जुने रेल्वेस्थानक आहे. हे ऐतिहासिक रेल्वेस्थानक Stockton and Darlington Railway या रेल्वेलाईनवर आहे.

हिलिंग्टन स्टेशन 1820 सालापासून वेगवेगळ्या कामासाठी नेहमीच उपयोगात आलेले आहे. रेल्वेचा विकास आणि विस्तार व्हायला सुरुवात झाली त्या वेळी रेल्वेस्थानक नावाची कल्पना अस्तित्त्वच नव्हती.

तेव्हा एका पबला मिळून या रेल्वेस्थानकाची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी प्रवासी येथे थांबायचे, मुक्काम करायचे. याच कारणामुळे हिलिंग्टन रेल्वेस्टेशनला जगातील पहिले प्रोटो रेल्वेस्टेशन म्हटले जाते.

याच प्रोटो रेल्वेस्टेशनला डोळ्यासमोर ठेवून नंतर जगभरात रेल्वे स्थानकांची निर्मिती करण्यात आली. या रेल्वे स्थानकावर अगोदर दगडांच्या मदतीने प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला होता. हा प्लॅटफॉर्म आजदेखील आहे. या प्लॅटफॉर्मचे आजघडीला बरेच नुकसान झालेले आहे. परंतु त्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन ते जपून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.