
जगप्रसिद्ध टेनिसस्टार मारिया शारापोव्हाने आपल्या 35 व्या वाढ दिवसादिवशी जगभरातील चाहत्यांना ती आई होणार असल्याची गुड न्यूज दिली आहे. स्वतः वाढदिवसा दिवशी बेबीबंपचा फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.

मारिया शारापोव्हाचा बॉयफ्रेंड अलेक्झांडर उद्योगपती असून, आर्ट डिलींगचा व्यवसाय करतो . एंगेजमेंटच्या वेळी त्याने मारियाला तब्बल तीन लाखपौंडाची हिऱ्याची अंगठी घातली होती. दोघांनीही अजून लग्न कधी करायचे हे ठरवलेले नाही.

मारिया शारापोव्हा तिचा बॉयफ्रेंड अलेक्झांडर 2018 पासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यानंतर 2020 मध्ये अलेक्झांडरने मारियाला प्रपोझ केलं होत. यावेळी अलेक्झांडरने मारियाला तीन लाख पौंडची हिऱ्याची अंगठी घालत एन्गजेमेंट झाल्याची माहिती होती.

मारियाने 2020 मध्ये आंतराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती घेतली. तिने 2012 मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सिल्वर पदक मिळवले होते. याबरोबरच तिने ऑस्ट्रेलिया ओपन, विम्बल्डन , अमेरिकाओपन व सलग दोनदा फ्रेंच ओपन आपल्या नावावर केले होते.

वयाच्या 18 व्या वर्षी मारिया टेनिसमध्ये जागतिक स्थानावर नंबरएकची खेळाडू बनली होती. आपल्या टेनिसच्या एकूण कारकिर्दीत तिने 36 पुरस्कार आपल्या नावावर केले होते.टेनिसमध्ये रूसचे प्रतिनिधीत्व करत असलेली मारिया 1994 पासून अमेरिकेत वास्तव्यास आहे.