
Billionaires City of World : जगातील या देशात सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती राहतात. दरवर्षी या आकड्यात मोठी वाढ होत आहे. धनकुबेरांची यादी वाढतच आहे. जगात या शहरात सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. भारतातील या शहरात सर्वाधिक श्रीमंत राहतात.

हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (Hurun Research Institute) अहवालाआधारे वर्ल्ड ऑफ स्टेटिस्टिक्सने (World of Statistics) सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर अब्जाधीशांच्या शहरांची यादी जाहीर केली आहे.

हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती या न्यूयॉर्क, लंडन, मुंबई, बीजिंग, शांघाई, शेन्जेन, हाँगकाँग, मॉस्को, नवी दिल्ली आणि सॅन फ्रान्सिस्को या शहरात राहतात. भारतातील मुंबईचा या यादीत नंबर लागला आहे. भारतातही गेल्या काही वर्षांत श्रीमंतांचा आकडा वाढला आहे.

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात 119 अब्जाधीश राहतात. तर ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये 97 अब्जाधीश राहतात. चीनची राजधानी बीजिंगमध्ये 91 अब्जाधीश राहतात. तर शांघाई 87 आणि शेनझेनमध्ये 84 सर्वाधिक श्रीमंत राहतात.

हाँगकाँगमध्ये 65 अब्जाधीश राहतात. तर रशियाची राजधानी मॉस्कोत 59 अब्जाधीश असून अमेरिकेतील अजून एक शहर सॅन फ्रान्सिस्कोमध्ये 52 अब्जाधीश राहतात. इतरही अनेक देशात अब्जाधीशांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसते

तर भारतात मुंबईत सर्वाधिक म्हणजे 92 अब्जाधीश राहतात. भारताची आर्थिक राजधानी अब्जाधीशी शहरांच्या यादीत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूयॉर्क आणि लंडननंतर मुंबईचा जगात नंबर लागतो. तर देशाची राजधानी दिल्लीमध्ये 57 अब्जाधीश राहत असल्याचे समोर आले आहे.